Maharashtra Scholarship Exam : पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्तीची परीक्षा पुढे ढकलली

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 15, 2022 | 22:28 IST

Maharashtra Scholarship Exam For Fifth And Eighth Class Postponed : कोरोना संकटामुळे १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत महाराष्ट्रातील शाळा बंद आहेत. यामुळे राज्यातील पाचवी आणि आठवीची २० फेब्रुवारी २०२२ रोजी होणार असलेली शिष्यवृत्तीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

Maharashtra Scholarship Exam For Fifth And Eighth Class Postponed
पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्तीची परीक्षा पुढे ढकलली  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्तीची परीक्षा पुढे ढकलली
  • २० फेब्रुवारी २०२२ रोजी होणार असलेली शिष्यवृत्तीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली
  • ऑनलाइन पद्धतीने फॉर्म आणि परीक्षा फी भरण्यासाठी ३१ जानेवारी २०२२ पर्यंत मुदतवाढ

Maharashtra Scholarship Exam For Fifth And Eighth Class Postponed : मुंबई : कोरोना संकटामुळे १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत महाराष्ट्रातील शाळा बंद आहेत. यामुळे राज्यातील पाचवी आणि आठवीची २० फेब्रुवारी २०२२ रोजी होणार असलेली शिष्यवृत्तीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षांची नवी तारीख कोरोना संकटाचा आढावा घेऊन काही दिवसांनी जाहीर केली जाईल. शिष्यवृत्तीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने फॉर्म आणि परीक्षा फी भरण्यासाठी ३१ जानेवारी २०२२ पर्यंत मुदतवाढ होण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेबाबतची घोषणा केली. या घोषणेमुळे विद्यार्थी आणि पालक तसेच शाळा प्रशासनांना दिलासा मिळाला आहे. 

महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने १४ जानेवारी २०२२ रोजी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात २ लाख ६१ हजार ६५८ कोरोना आणि ७४६ ओमायक्रॉन अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ४३ हजार २११ नव्या कोरोना रुग्णांची आणि १९ मृत्यूची नोंद झाली. राज्यातले ३३ हजार ३५६ कोरोना रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत आढळलेल्या १६०५ ओमायक्रॉनबाधीत रुग्णांपैकी ८५९ बरे झाले. राज्यात आढळलेल्या ७१ लाख २४ हजार २७८ कोरोना रुग्णांपैकी ६७ लाख १७ हजार १२५ बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ४१ हजार ७५६ मृत्यू झाले तसेच ३७३९ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी