Maharashtra School Education: राज्यात केरळ पॅटर्न शिक्षण होणार... काय आहे हे केरळ मॉडल वाचा...

मुंबई
सुनिल देसले
Updated Nov 22, 2022 | 18:45 IST

Maharashtra School education news updates: राज्यातील शिक्षण पद्धत बदलण्याच्या संदर्भात लवकरच मोठा निर्णय घेण्यात येणार असल्याचे संकेत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहेत.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • विद्यार्थ्यांना नापास करणार नाही पण परीक्षा घेणार - शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती
  • नापास न करणं आणि परीक्षा न घेणं या वेगळ्या गोष्टी आहेत - दीपक केसरकर

Maharashtra School Education News: पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत. त्यांना थेट तिसरीच्या वर्गात पाठवले जाईल. तर तिसरीपासून पुढील वर्घातली विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यांच्या परीक्षा जरी घेतल्या जाणार असल्या तरी त्यांना नापास मात्र केले जाणार नाही असं शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. (maharashtra school education minister deepak kesarkar gives hint to implement kerala education pattern in state read in marathi)

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं, परीक्षा अशासाठी घेतली पाहिजी की पहिली आणि दुसरीतील विद्यार्थी खूपच लहान असतात. त्यांच्यावर बोजा येता कामा नये इथपर्यंत ठिक आहे. आठवीपर्यंत कोणाला नापास करायचं नाही हे सुद्धा ठिक आहे. नापास न करणं आणि परीक्षा न घेणं हे दोन्ही वेगवेगळे भाग आहेत. त्यामुळे नापास कुणालाही केलं जाणार नाही पण त्याचवेळी परीक्षा सुद्धा घेतले जातील.

हे पण वाचा : म्हणून लहान मुले रात्रीचे जागतात

केरळ पॅटर्न नेमका कसा आहे? 

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात केरळ पॅटर्न शिक्षण पद्धत राबवण्याचा विचार केला जात आहे. हा केरळ पॅटर्न नेमका काय आहे जाणून घेऊयात... प्राथमिक शाळा चालवण्याचे आणि नोकर भरतीचे अधिकारहे ग्रामपंचायतींना असणार आहेत. माध्यमिक शाळांचे अधिकार हे जिल्हा परिषदांना असतील. प्रत्येक महिन्याला विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेतली जाईल. कमी मार्क्स मिळाल्यास पुन्हा परीक्षा घेतल्या जातील. दर 10 वर्षांनी अभ्यासक्रमात बदल करण्यात येईल.

हे पण वाचा : म्हणून स्वप्नात मृत नातेवाईक दिसतात

दप्तराचे ओझे कमी

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत. त्याचा एक भाग म्हणून आता यापुढे पुस्तकांमध्ये सरावासाठी कोरी पाने जोडली जाणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत वेगळ्या वह्या घेऊन जाण्याची गरज भासणार नाही.

राज्यातील शिक्षण विभागाने विविध राज्यांतील शिक्षण पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी दौरे केले होते. त्यापैकी केरळ राज्याने केलेले प्रयोग हे यशस्वी ठरले असून तसे प्रयोग आता राज्यात राबवण्याची तयारी सुरू झाल्याचं बोललं जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी