Maharashtra School: मामाच्या गावाला जाऊ या.... पण कधी; जाणून घ्या सुट्ट्याचं Timing

मुंबई
भरत जाधव
Updated Apr 04, 2023 | 10:16 IST

राज्यातील शाळांना 2 मे पासून सुट्टी  ( Summer Vacation)  जाहीर झाली असून ही सुट्टी 11 जूनपर्यंत असणार आहे. नवीन शैक्षणिक ( New Academic Year) वर्ष 12 जूनपासून सुरु होणार आहे. तर, विदर्भातील शाळा मात्र उन्हाळ्याची तीव्रता पाहता 26 जून पासून सुरू होतील.

Plan to go to uncle's village
मुलांनो! मामाच्या गावाला जाण्याचा प्लान करा Ready  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • राज्यातील शाळांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी
  • नवीन शैक्षणिक वर्ष 12 जूनपासून होणार सुरू
  • विदर्भातील शाळा 26 जून पासून सुरू होतील.

मुंबई:  एप्रिल महिना चालू आहे, या महिन्यात बहुतेक मुलं- मुली मामाच्या गावाला जाण्याचा प्लान करत असतात. तर काही पालक आपल्या मुलांना घेऊन कुठे बाहेरगावी फिरण्याचा प्लान करत असतात. एकदा का  सुट्ट्या जाहीर झाल्या की भटकंती करणारे आणि आजोळी जाणाऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद येत असतो. तोच आनंद ही बातमी वाचून तुम्हाला होणार आहे. कारण  राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.   (Maharashtra School: Let's Go to uncle's Village.... But When; Know the timing of the holiday)

अधिक वाचा  : WhatsApp, Facebook Messagesने द्या हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

राज्यातील शाळांना 2 मे पासून सुट्टी  ( Summer Vacation)  जाहीर झाली असून ही सुट्टी 11 जूनपर्यंत असणार आहे. नवीन शैक्षणिक ( New Academic Year) वर्ष 12 जूनपासून सुरु होणार आहे. तर, विदर्भातील शाळा मात्र उन्हाळ्याची तीव्रता पाहता 26 जून पासून सुरू होतील. याबाबतचे  परिपत्रक शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आले आहे. 

या पत्रकानुसार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी लागू होईल. मे 2 पासून सुरू झालेली उन्हाळी सुट्टी ही 11 जूनपर्यंत असेल. तर राज्यभरातील नवं शैक्षणिक वर्ष हे 12 जून पासून सुरू केले जाणार आहे. तर विदर्भातील उन्हाळा लक्षात घेता त्या भागातील नवं शैक्षणिक वर्ष हे जून महिन्याच्या चौथ्या सोमवार पासून म्हणजेच 26 जून पासून सुरू होणार आहे.  

अधिक वाचा  : हनुमान जयंतीच्या मराठी शुभेच्छा Images

इयत्ता पहिली ते नववी आणि इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल शाळांना 30 एप्रिल रोजी किंवा त्यानंतर उन्हाळी सुट्टीच्या काळात जाहीर करता येणार आहे. हा निकाल संबंधित विद्यार्थ्यांनी पालकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी ही शाळांची असेल. शाळातून उन्हाळी किंवा दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून नाताळ किंवा गणेशोत्सव दरम्यान समायोजन करण्याचे अधिकार शिक्षण अधिकाऱ्यांच्या परवानगीने देण्यात येणार आहे.

अधिक वाचा  : Hanuman Aarti: म्हणा हनुमानाची आरती मारुतीरायाला प्रसन्न करा

तसेच शैक्षणिक वर्षातील एकूण सुट्ट्या या 76 पेक्षा अधिक होणार नाही याची दक्षता शिक्षण अधिकाऱ्यांनी द्यावी, असं सुद्धा परिपत्रकात म्हटले आहे. शिक्षण संचालनालयाने हे परिपत्रक काढून विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी, माध्यमिक आणि शिक्षण निरीक्षक यांना आदेश दिले आहेत.   


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी