Maharashtra School Reopen : पहिली ते सातवीचे वर्ग होणार सुरू, आरोग्य विभागाची परवानगी, येत्या 10 दिवसात होणार पक्का निर्णय

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 24, 2021 | 14:19 IST

Maharashtra School Reopen :राज्यातील पहिली ते सातवीच्या शाळा (School ) सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाची (Department of Health) कोणतीही अडचण नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी म्हटलं आहे.

Classes 1 to 7 will start, with the permission of the health department
Maharashtra School Reopen : पहिली ते सातवीचे वर्ग होणार सुरू  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पहिली ते चौथीचे वर्ग सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून शाळा सुरू होणार
  • राज्यात सध्या 700-800 कोरोना रुग्ण आढळून येत आहेत.
  • मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतर पहिली ते चौथीचे वर्ग सुरु होण्याबाबत आदेश जारी होणार

Maharashtra School Reopen : मुंबई: राज्यातील पहिली ते सातवीच्या शाळा (School ) सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाची (Department of Health) कोणतीही अडचण नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री (Chief Minister) आणि कॅबिनेटच्या बैठकीत (Cabinet meeting) यासंदर्भातील अंतिम निर्णय होईल. येत्या 10 दिवसात याबाबत निर्णय होईल, असेही राजेश टोपे म्हणाले.

पहिली ते चौथी यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना ते बऱ्यापैकी जाऊन संसर्गित होणार नाहीत याची काळजी घेत त्यांना आपण शाळेमध्ये येऊन दिले पाहिजे. पहिली ते चौथीचे वर्ग सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन सुरू करण्यास परवानगी द्यावी यासंदर्भात चाईल्ड टास्क फोर्सने मत मांडले आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आणि कॅबिनेटला आहे. आरोग्य विभागाची पहिली ते चौथी वर्ग सुरु करण्यास कोणती अडचण नसल्याचे टोपेंनी म्हटले आहे. परंतु याविषयीचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, अशी माहिती त्यांनी दिली. 

सध्या राज्यात पाचवी पासून पुढील वर्ग सुरू आहेत. शहरी आणि ग्रामीण भागात पहिली ते चौथीचे वर्ग बंद आहेत. पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करावेत यासाठी शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव आहे. आता आरोग्य विभागाने देखील यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतर पहिली ते चौथीचे वर्ग सुरु होण्याबाबत आदेश जारी केली जातील, असं राजेश टोपे म्हणाले.

पालकांनी शाळा व्यवस्थापनावर विश्वास ठेवावा

राज्यात सध्या 700-800 रुग्ण आढळून येत आहेत. रुग्ण होण्याचा दर देखील चांगला आहे. पालकांनी शाळा व्यवस्थापनावर विश्वास ठेऊन मुलांना शाळेत पाठवण्यासंदर्भात संमतीपत्र द्यावे. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतर पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे.
राजेश टोपे म्हणाले की, नाट्यगृह, सिनेमागृहांना आता 50% परवानगी दिली आहे. ही परिस्थिती सुधारली तर निर्बंधांबाबत सकारात्मक विचार करता येईल. त्यावरही मुख्यमंत्री निर्णय घेतील. त्यांनी म्हटलं की, सध्या लग्नसराईमुळे गर्दी वाढत आहे. यात सोशल डिस्टन्स दिसत नाही.  बिनधास्तपणा जाणवतोय.  ही मानसिकता घातक आहे.  जागरूक राहिले पाहिजे. दुसऱ्या लाटेत आपले नुकसान झाले आहे, असंही टोपे म्हणाले. 

महाराष्ट्रात तिसरी लाट राहणार सौम्य

महाराष्ट्रात तिसरी लाट सौम्य स्वरुपाची शक्यता आहे, असं राजेश टोपे म्हणाले. बारा ते अठरा वयोगटातील विद्यार्थी संसर्गित झाला तर तो त्याच्या आजी आणि आजोबांना संसर्गित करू शकतो.  त्यामुळे या विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यासंदर्भात केंद्र सरकारने निर्णय घ्यावा, असे राजेश टोपे म्हणाले.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी