Maharashtra School Reopening Decision Likely To Be Taken In Cabinet Meeting : मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचे २ लाख ६७ हजार ६५९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. परिस्थिती नियंत्रणात आहे. यामुळे राज्यातील शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होईल आणि परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.
राज्यातील शाळा १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर झाला आहे. मात्र शाळा बंद ठेवून ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवण्याच्या धोरणाचा गरीब आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. ज्या घरात एकपेक्षा जास्त मुले आहेत अशा ठिकाणी ऑनलाइन शिक्षणासाठी दोन मोबाइल घेणे सर्वांनाच परवडणारे नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी आजही इंटरनेट कनेक्शन व्यवस्थित मिळत नाही. यामुळे जिथे कोरोना नियंत्रणात आहे अशा जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.