Maharashtra School Reopening : सोमवार २४ जानेवारीपासून शाळा पुन्हा सुरू होणार

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 20, 2022 | 16:37 IST

Maharashtra School Reopening From 1st To 12th Class From Monday 24th January 2022 : महाराष्ट्रातील पहिली ते बारावी पर्यंतचे शाळा आणि ज्युनिअर कॉलेजचे वर्ग सोमवार २४ जानेवारी २०२२ पासून पुन्हा सुरू होत आहेत.

Maharashtra School Reopening From 1st To 12th Class From Monday 24th January 2022
सोमवार २४ जानेवारीपासून शाळा पुन्हा सुरू होणार 
थोडं पण कामाचं
  • सोमवार २४ जानेवारीपासून शाळा पुन्हा सुरू होणार
  • पहिली ते बारावी पर्यंतचे शाळा आणि ज्युनिअर कॉलेजचे वर्ग सुरू होणार
  • स्थानिक पातळीवर ज्या ठिकाणी कोरोना संकट नियंत्रणात असेल तिथे शाळा सुरू होणार

Maharashtra School Reopening From 1st To 12th Class From Monday 24th January 2022 : मुंबई : महाराष्ट्रातील पहिली ते बारावी पर्यंतचे शाळा आणि ज्युनिअर कॉलेजचे वर्ग सोमवार २४ जानेवारी २०२२ पासून पुन्हा सुरू होत आहेत. स्थानिक पातळीवर ज्या ठिकाणी कोरोना संकट नियंत्रणात असेल तिथे प्रशासन शाळा आणि ज्युनिअर कॉलेजचे वर्ग सुरू करण्याबाबतचा निर्णय घेईल; अशी माहिती महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. याआधी राज्य शासनाने कोरोना संकटाचे कारण देऊन पहिली ते बारावी पर्यंतचे शाळा आणि ज्युनिअर कॉलेजचे वर्ग १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत बंद ठेवणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण नगण्य आहे यामुळे शाळा आणि ज्युनिअर कॉलेजचे वर्ग सुरू करण्याची मागणी अनेक शिक्षक तसेच पालक संघटनांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन सोमवारपासून शाळा आणि ज्युनिअर कॉलेजचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. पूर्व प्राथमिक शाळा सुरू करण्याचीही परवानगी देण्यात आली आहे.

स्थानिक पातळीवर कोरोना संकटाचा आढावा घेतल्यानंतर प्रशासनाने परवानगी दिली तर संबंधित भागातील शाळा आणि ज्युनिअर कॉलेजचे वर्ग सुरू होतील. कोविड प्रोटोकॉलचे पालन करुन शाळा आणि ज्युनिअर कॉलेजचे वर्ग सुरू केले जातील. मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण नगण्य आहे यामुळे शाळा आणि ज्युनिअर कॉलेजचे वर्ग सुरू ठेवा; अशी मागणी जोर धरू लागली. अखेर राज्य शासनाने कोरोना नियंत्रणात असलेल्या भागांमध्ये सोमवारपासून शाळा आणि ज्युनिअर कॉलेजचे वर्ग सुरू करत असल्याचे जाहीर केले.

शालेय शिक्षणमंत्र्यांनी शिक्षक तसेच पालक संघटनांच्या मागण्यांची दखल घेऊन कोरोना संकट नियंत्रणात असलेल्या भागांमध्ये शाळा आणि ज्युनिअर कॉलेजचे वर्ग सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बातचीत केल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. 'मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे. आता कोरोना नियंत्रणात असलेल्या भागांमध्ये सोमवार २४ जानेवारीपासून शाळा आणि ज्युनिअर कॉलेजचे वर्ग सुरू केले जातील'; असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

केंद्र सरकारने १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू केले आहे. यामुळे ज्या पात्र मुलांनी अद्याप लस घेतलेली नाही त्यांनी लवकर लसीकरण करुन घ्यावे; असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले. ज्या शिक्षकांनी कोरोना प्रतिबंधक लसचा दुसरा डोस अद्याप घेतलेला नाही त्यांनीही लवकर लसीकरण करुन घ्यावे; असे आवाहन वर्षा गायकवाड यांनी केले.

राज्य शासनाने १५ फेब्रुवारी पर्यंत शाळा आणि ज्युनिअर कॉलेजचे वर्ग बंद करुन ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पण अनेक शिक्षक तसेच पालक संघटनांनी या निर्णयाला विरोध केला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी