SSC Exam 2023: 2 मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू, सर्व विद्यार्थ्यांना ALL THE BEST

मुंबई
सुनिल देसले
Updated Mar 01, 2023 | 21:24 IST

Maharashtra SSC Board Exam: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 10 वीच्या लेखी परीक्षांना गुरुवार, 2 मार्च 2023 पासून सुरूवात होत आहे. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमध्ये इयत्ता 10 वी साठी एकूण पाच हजार 33 केंद्रांवर परीक्षा आयोजित
  • या परीक्षेसाठी 23 हजार 10 माध्यमिक शाळांमधून एकूण 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यामध्ये आठ लाख 44 हजार 116 विद्यार्थी, तर 7 लाख 33 हजार 67 विद्यार्थिनी आहेत

Maharashtra SSC Class 10th Exam starts: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education board) वतीने घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 10 वीच्या लेखी परीक्षांना गुरुवार, 2 मार्च 2023 पासून सुरूवात होत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळात मार्च 2023 माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) ची लेखी परीक्षा गुरुवार, दिनांक 2 मार्च 2023 ते शनिवार दिनांक 25 मार्च 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी एकूण 15,70,256 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यामध्ये आठ लाख 44 हजार 116 विद्यार्थी, तर 7 लाख 33 हजार 67 विद्यार्थिनी आहेत. 

10वीच्या परीक्षेची ठळक वैशिष्टये

मार्च 2023 च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन स्विकारण्यात आलेली असून सरल हटावान माध्यमिक शाळांची माहिती घेऊन आवेदनपत्रे ऑनलाईन भरलेली आहेत. विद्यार्थ्यांचे क्षणिक हित लक्षात एकही विद्यार्थी परीपासून वंचित राहू नये दिनांक 5 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन आवेदनपत्रे स्विकारण्यात आलेली आहेत.

हे पण वाचा : Exam Tips:परीक्षेच्या वेळी करू नका या चुका

विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने मार्च 2023 च्या माध्यमिक शालान्त (इ. 10वी) परीक्षेचे वेळापत्रक तयार करण्यात आले असून परीक्षेदरम्यान महत्वाच्या बहुतांश विषयांच्या पेपरमध्ये खंड ठेवण्यात आला आहे. मंडळामार्फत प्रसिद्ध आणि छपाई केलेले वेळापत्रकच ग्राह्य धरावे.

परीक्षांच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भीतीने मानिक अस्तात अशा विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यास मदरसाठी राज्य स्तरावरून समुपदेशन करण्यासाठी 10 समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्याच्या शंकांचे निरमर करण्यासाठी विभागीय स्तरावर मंडळामध्ये जिल्हानिहाय प्रत्येकी दोन याप्रमाणे समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच राज्यमंडळ आणि 9 विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करुन हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे.

हे पण वाचा : रात्री गाढ झोप येण्यासाठी काय करावे?

प्रश्नपत्रिकेची गोपनीयता अबाधित राहण्यासाठी मुख्य परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोच करण्याकरिता आणि उत्तरपत्रिका आणण्याकरिता नेमण्यात आलेल्या सहाय्यक परिरक्षक (स्तर) यांनी जीपीएस प्रणाली सुरू ठेवणे आवश्यक करण्यात आलेले आहे.

सर्व परीक्षार्थ्यांना परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना सर्व माध्यमिक शाळांमार्फत परीक्षार्थ्यांना देण्यात आलेल्या आहेत. तसेच परीक्षार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रवेशपत्रातही (Hall Ticket) नमूद करण्यात आलेले आहे. सकाळ सत्रात 10.30 वाजता आणि दुपारच्या सत्रात 2.30 वाजता परीक्षार्थ्यांनी परीक्षा दालनात उपस्थित राहणे आवश्यक आहे. फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेपासून सकाळच्या सत्रात सकाळी 11.00 तसेच दुपारच्या सत्रात दुपारी 3.00 वाजवा परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल.

हे पण वाचा : रिकाम्या पोटी काकडी खाण्याचे फायदे तुम्हाला माहितीयेत का?

परीक्षा निकोप, भयमुक्त आणि फॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा मार्च 2023 परीक्षेपासून रद्द करण्यात आली आहे. तथापि पेपरच्या निर्धारित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटे वाढवून देण्यात आली आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी