SSC result 2020: दहावीचा निकाल लवकरच जाहीर होणार, असा पाहू शकता निकाल

मुंबई
Updated Jul 22, 2020 | 13:06 IST | टाइम्स नाऊ मराठी

Maharashtra ssc result 2020: महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल लवकरच जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थीही निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.

ssc result
दहावीचा निकाल लवकरच जाहीर होणार 

थोडं पण कामाचं

  • कोरोनामुळे यंदा निकाल लागण्यास उशीर
  • गेल्या वर्षी ८ जूनला जाहीर झाला होता निकाल
  • १६ जुलैला बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला

मुंबई: Maharashtra ssc result 2020: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून(MSBSHSE) घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा(ssc result) निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे. सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. बारावीचा निकाल काही दिवसांपूर्वीच जाहीर झाला असून आता दहावीचे विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. इंडिया डॉट कॉमच्या बातमीनुसार रिपोर्टनुसार पुढच्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होऊ शकतो. 

दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केल्यानंतर विद्यार्थी mahresult.nic.in, maharashtraeducation.com, and mahahsscboard.maharashtra.gov.in. या वेबसाईट्सवर आपला निकाल पाहू शकतात. १६ जुलैला बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर आता दहावीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. 

दरवर्षी जूनच्या सुरूवातीच्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर केला जातो. मात्र यंदा कोरोनामुळे निकाल लागण्यात उशीर झाला आहे. उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करण्यास उशीर झाल्यामुळे निकाल जाहीर करण्यास विलंब झाला आहे. कोरोनाचा प्रकोप सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे निकालासही उशीर लागला. कोरोना विषाणूमुळे दहावीचा शेवटचा पेपरही होऊ शकला नाही. भूगोलाचा शेवटचा पेपर बाकी असताना कोरोनाचा कहर वाढू लागला. अखेर हा पेपर रद्द करावा लागला. त्यामुळे इतर विषयांच्या सरासरीने विद्यार्थ्यांना गुण दिले जाणार आहेत. 

दहावीसाठी यंदाच्या वर्षी १७ लाख विद्यार्थी बसले होते. याआधी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले होते की जुलैच्या अखेरीस दहावीचा निकाल जाहीर होऊ शकतो. 

बारावीचा निकाल जाहीर

यंदा १६ जुलैला बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ९०.६६ टक्के इतका लागला. या निकालात यंदा ९३.८८ टक्के विद्यार्थींनी उत्तीर्ण झाल्या आहेत. तर ८८.०९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेचे ८२.६३ टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले तर वाणिज्य शाखेचे ९१.२७ टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेचे ९६.९३ टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. 

या वेबसाईटवर पाहता येणार निकाल

mahresult.nic.in, 
maharashtraeducation.com
mahahsscboard.maharashtra.gov.in.

गेल्या वर्षी दहावीचा निकाल कधी?

गेल्या वर्षी दहावीचा निकाल ८ जून २०१९ रोजी जाहीर झाला होता. मात्र यंदा कोरोनामुळे या निकालास उशीर झाला आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी