SSC, HSC Exam 2023 updates: 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, परीक्षेसाठी 10 मिनिटे अधिक वेळ मिळणार

मुंबई
सुनिल देसले
Updated Feb 15, 2023 | 20:19 IST

Maharashtra HSC and SSC exams 2023: राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण, शिक्षण मंडळाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Maharashtra SSC class 10 and HSC class 12 students will get 10 minutes extra during exam 2023 read notification pdf file mahahsc in www.mahahsscboard in
SSC, HSC Exam 2023 updates: 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, परीक्षेसाठी 10 मिनिटे अधिक वेळ मिळणार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • इयत्ता बारावीची परीक्षा मंगळवार 21 फेब्रुवारी 2023 पासून ते 21 मार्च 2023 या कालावधीत होणार
  • इयत्ता दहावीची परीक्षा गुरुवार 2 मार्च 2023 पासून सुरू होणार आहे. तर 25 मार्च 2023 पर्यंत सुरू राहणार आहे

Maharashtra Education board HSC, SSC examination updates: राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षेपूर्वी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षे दरम्यान 10 मिनिटे वाढवून देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) या संदर्भात एक नोटिफिकेशन काढलं आहे.

काय म्हटलंय बोर्डाच्या नोटिफिकेशनमध्ये? (SSC, HSC Exam 2023 latest notification pdf)

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12वी) आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी (आकलन होण्यासाठी) परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर करण्यात येत होते.

इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वी च्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्याने पालक व समाज घटक यांचे या परीक्षांकडे बारकाईने लक्ष असते. परंतु, प्रश्नपत्रिका मोबाइलवर तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा आणि काही अंशी अशा घटना निदर्शनास आलेल्या आहेत.

अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध व्हावा तसेच परीक्षा निकोप, भयमुक्त आणि कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेपासून रद्द करण्यात येत असल्याचे कळविण्यात आले आहे.
तथापि विद्यार्थी हित लक्षात घेवून आणि पालक, विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करुन सदरची दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर वाढवून देण्यात येत आहेत.

फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेपासून सकाळच्या सत्रात सकाळी 11 वाजता तसेच दुपारच्या सत्रात दुपारी 3 वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल. तसेच लेखनास प्रारंभ होईल. सकाळच्या सत्रात सकाळी 10.30 वाजता तसेच दुपारच्या सत्रात दुपारी 2.30 वाजता परीक्षार्थ्याने परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.

हे पण वाचा : पेनाच्या टोपणाला छिद्र का असतं? जाणून घ्या

  परीक्षेची सध्याची वेळ परीक्षेची सुधारित वेळ
सकाळ सत्र सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 सकाळी 11.00 ते दुपारी 2.10
सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 सकाळी 11.00 ते दुपारी 1.10
सकाळी 11.00 ते दुपारी 1.30 सकाळी 11.00 ते दुपारी 1.40
दुपार सत्र दुपारी 3.00 ते सायंकाळी 6.00 दुपारी 3.00 ते सायंकाळी 6.10
दुपारी 3.00 ते सायंकाळी 5.00 दुपारी 3.00 ते सायंकाळी 5.10
दुपारी 3.00 ते सायंकाळी 5.30 दुपारी 3.00 ते सायंकाळी 5.40

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी