Maharashtra SSC, HSC Results 2022: तारीख, वेळ, डाउनलोड कसे करायचे, जाणून घ्या तपशील 

Maharashtra SSC, HSC Results 2022: ज्या वेबसाइटवर दहावी आणि बारावीचे निकाल लागणार आहेत. त्या वेबसाइटची यादी जाणून घ्या. 

Maharashtra SSC, HSC Results 2022: डाउनलोड कसे कसा कराल
Maharashtra SSC, HSC Results 2022: तारीख, वेळ, डाउनलोड कसे करायचे, जाणून घ्या तपशील   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSHSEB) अधिकृतपणे पुष्टी केली आहे की ते SSC, HSC 2022 चे निकाल  जून 2022 मध्ये जाहीर करतील.
 • १२ वीचा निकाल हा १०  जून 2022 रोजी तर १० वीचा निकाल दहा दिवसांनंतर म्हणजे २० जून रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.
 • महाराष्ट्र SSC आणि HSC परीक्षा 2022 साठी बसलेल्या उमेदवारांनी सर्व लेटेस्ट अपडेट्स आणि तपशीलांसाठी अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

मुंबई :  महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSHSEB) अधिकृतपणे पुष्टी केली आहे की ते SSC, HSC 2022 चे निकाल  जून 2022 मध्ये जाहीर करतील. ताज्या अपडेटनुसार, १२ वीचा निकाल हा १०  जून 2022 रोजी तर १० वीचा निकाल दहा दिवसांनंतर म्हणजे २० जून रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.  महाराष्ट्र SSC आणि HSC परीक्षा 2022 साठी बसलेल्या उमेदवारांनी सर्व लेटेस्ट अपडेट्स आणि तपशीलांसाठी अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.


महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSHSEB) उमेदवारांना SSC, HSC निकाल 2022 वरील सर्व तपशील अधिकृत वेबसाइटद्वारे अपडेट करणे अपेक्षित आहे.

Maharashtra SSC, HSC Results 2022:  वेबसाइट्सची यादी (Websites List)

महाराष्ट्र एसएससी, एचएससी निकाल 2022 अधिकृतरीत्या जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी निकाल तपासण्यासाठी पुढील वेबसाइटचा वापर करू शकतात :

 1. mahahsscboard.in
 2. msbshse.co.in
 3. mh-ssc.ac.in
 4. mahresult.nic.in

एकदा महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSHSEB) निकाल जाहीर केल्यानंतर, विद्यार्थी वरीलपैकी कोणत्याही वेबसाइटद्वारे त्यांचा प्रवेश करू शकतात.

Maharashtra SSC, HSC Results 2022:  कसे तपासायचे

एसएससी, एचएससी निकाल 2022 बोर्डाने अधिकृतपणे जाहीर केल्यावर उमेदवारांनी 2022 डाउनलोड करण्यासाठी येथे स्टेप बाय स्टेप प्रक्रिया आहे:

mahahsscboard.in, msbshse.co.in, mh-ssc.ac.in किंवा mahresult.nic.in यापैकी कोणत्याही अधिकृत वेबसाइटवर जा.

 1. एसएससी किंवा बारावीचा निकाल सांगणाऱ्या लिंकवर क्लिक करा.
 2. आवश्यक तपशील जसे की रोल नंबर आणि आईचे नाव प्रविष्ट करा.
 3. प्रविष्ट केलेल्या सर्व माहितीची पडताळणी केल्यानंतर, सबमिट वर क्लिक करा.
 4. तुमचा महाराष्ट्र SSC, HSC चे निकाल 2022 स्क्रीनवर दिसतील.
 5. भविष्यातील संदर्भासाठी निकाल डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या.

 महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSHSEB) ची 10 जूनला १२ वी आणि २० जून रोजी १० वीचा निकाल लागू शकतो अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी