Maharashtra SSC Result 2022 Live : दहावीला बसलेले ९६.९४ विद्यार्थी पास

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jun 17, 2022 | 12:54 IST

Maharashtra SSC Result 2022 live, MSBSHSE board 10, date, toppers list, Varsha Gaikwad mahresult nic in sscresult mkcl org : महाराष्ट्रात दहावीच्या परीक्षेला बसलेले ९६.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

Maharashtra SSC Result 2022 live, MSBSHSE board 10, date, toppers list, Varsha Gaikwad mahresult nic in sscresult mkcl org
Maharashtra SSC Result 2022 Live : दहावीला बसलेले ९६.९४ विद्यार्थी पास  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Maharashtra SSC Result 2022 Live : दहावीला बसलेले ९६.९४ विद्यार्थी पास
  • दहावीच्या परीक्षेत ९६.०६ टक्के मुलगे आणि ९७.९६ टक्के मुली उत्तीर्ण
  • दहावीच्या परीक्षेत २४ विषयांचा निकाल १०० टक्के

Maharashtra SSC Result 2022 live, MSBSHSE board 10, date, toppers list, Varsha Gaikwad mahresult nic in sscresult mkcl org : मुंबई : महाराष्ट्रात दहावीच्या परीक्षेला बसलेले ९६.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परीक्षेला मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, 
अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागातून नोंदणी केलेल्यांपैकी १५ लाख ६८ हजार ९७७ जण बसले होते. यापैकी १५ लाख २१ हजार ३ जण उत्तीर्ण झाले. 

पुन्हा परीक्षा देण्यासाठी नोंदणी करणाऱ्या ५४ हजार १५९ जणांपैकी ५२ हजार ३५१ जणांनी परीक्षा दिली. यातील ४१ हजार ३९० उत्तीर्ण झाले. हा निकाल ७९.०६ टक्के आहे. विभाग पातळीवर कोकणात सर्वाधिक ९९.२७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नाशिकचा निकाल सर्वात कमी म्हणजे ९५.९० टक्के लागला. 

दहावीच्या परीक्षेत ९६.०६ टक्के मुलगे आणि ९७.९६ टक्के मुली उत्तीर्ण झाले. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा १.९० टक्क्याने जास्त आहे. परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या ८१६९ जणांपैकी ८०२९ जणांनी परीक्षा दिली. यातील ७५७९ दिव्यांग उत्तीर्ण झाले. हे प्रमाण ९४.४० टक्के आहे.

यंदा दहावीच्या परीक्षेत २४ विषयांचा निकाल १०० टक्के लागला. राज्यातील नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ६ लाख ५० हजार ७७९ प्राविण्यासह तर ५ लाख ७० हजार ०२७ जण प्रथमश्रेणीत उत्तीर्ण झाले. परीक्षेत २ लाख ५८ हजार ०२७ जण दुसऱ्या श्रेणीत तर ४२ हजार १७० जण तिसऱ्या श्रेणीत उत्तीर्ण झाले. 

या वर्षी दहावीच्या परीक्षेसाठी महाराष्ट्रातल्या २२ हजार ९२१ शाळांतील १६ लाख ३८ हजार ९६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी १२ हजार २१० शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी