Maharashtra ST strike : 'डंके की चोट पर' म्हणणाऱ्या वकिल साहेबांना मोठी चोट, ST कामगार संघटनेनं केली हकालपट्टी

मुंबई
भरत जाधव
Updated Jan 10, 2022 | 20:24 IST

गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी (ST staff) विलिनीकरणासाठी आंदोलन (Agitation) पुकारला आहे. राज्य सरकारने (State Government) दिलेली मोठी पगारवाढ (Salary) आणि कारवाईनंतरही मागे न हटता आंदोलन सतत चालू ठेवणाऱ्या एसटी कामगार संघटनेमध्ये (ST workers union) मोठी घडामोड झाली.

st workers union fired gunratna sadavarte
अॅड. गुणरत्न सदावर्ते  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • वकिल गुणरत्न सदावर्ते यांच्यामुळे लोकांच्या डोक्यात भ्रम निर्माण झाला.
  • एसटी आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर शरद पवार आणि एसटी कामगार संघटनेत बैठक पार पडली.
  • जनतेला वेठीला धरून कुणाचाही फायदा होणार नाही- कामगार संघटना

Maharashtra ST Worker Strike : मुंबई: गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी (ST staff) विलिनीकरणासाठी आंदोलन (Agitation) पुकारला आहे. राज्य सरकारने (State Government) दिलेली मोठी पगारवाढ (Salary) आणि कारवाईनंतरही मागे न हटता आंदोलन सतत चालू ठेवणाऱ्या एसटी कामगार संघटनेमध्ये (ST workers union) मोठी घडामोड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (President of the Nationalist Congress) आणि महाविकास आघाडीसाठी (Mahavikas Aghadi) पुढाकार घेणारे शरद पवार (Sharad Pawar) यांनी एसटी आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर (Sahyadri Guest House) घेतलेल्या बैठकीनंतर ही घडामोड झाली. एसटी कामगार संघटनेने डंके की चोट पर म्हणून आंदोलन पुढे नेणाऱ्या अॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunaratna Sadavarte) यांना जबरदस्त 'चोट' दिली आहे.   

एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरण घेण्याच्या मागणीसाठी होणाऱ्या या आंदोलनात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेऊन डंके की चोट पे म्हणत मोर्चा सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण, आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत बैठकीनंतर कामगार कृती संघटनेनं गुणरत्न सदावर्ते यांना हटवण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या जागी सतिश पेंडसे (satish pendse) यांची नियुक्ती केली आहे. हा  निर्णय घेऊन सदावर्तेंना कामगार संघटनेने चांगला मोठा डंक मारला आहे. 

राज्यात गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप (Bus Strike) सुरू आहे. काही कर्मचारी कामावर परतले असले तरी अजूनही काही एसटी कर्मचारी संपातून माघार घ्यायला तयार नाहीत. अशात आज या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादीचे खासदार शरद यांच्या उपस्थितीत एसटीच्या कृती समितीची बैठक झाली आहे. या बैठकीला परिवहन मंत्री अनिल परबदेखील उपस्थित होते. यावेळी संघटनेने न्यायालयीन लढाई सुरूच राहणार आहे, कर्मचाऱ्यांनी कामावर परत यायला हवे, असे आवाहन केले आहे.

'गेले 2 महिने ST कर्मचार्याचा संप चालू होता. आज शरद पवार यांच्या उपस्थितीत 22 वेगवेगळ्या एसटी कर्मचारी संघटनांशी प्रदीर्घ चर्चा झाली. जे कर्मचारी कामावर येतील त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही. ST आणि जनतेला वेठीला धरून कुणाचाही फायदा होणार नाही, अशी भूमिका कामगार संघटनेनं मांडली.

तसेच, 'वकिल गुणरत्न सदावर्ते यांच्यामुळे लोकांच्या डोक्यात भ्रम निर्माण झाला होता. वकिलसाहेब स्व:त: डिप्रेशनमध्ये आहेत. “ वकिल गुणरत्न सदावर्तेंच्या आक्रस्ताळेपणा मुळे एसटी कर्मचाऱ्यांची चूल बंद होण्याची वेळ आली आहे. कामावर परत आल्यानंतर ज्यांची नोकरी गेलीय ती आता वाचणार आहे. ST टिकवण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांची आहे, ST टिकेल तर आपण टिकू, असं आवाहन सुनिल निरभवने यांनी केलं. तर, आम्ही पुकारलेला संप 20 डिसेंबर रोजी मागे घेतलेला होता. पण काही अडचणी होत्या त्या आता सोडवलेल्या आहेत. सातव्या वेतन आयोगाप्रमाणे कसे वेतन देता येईल, या संदर्भात चर्चा झाली. आज आम्ही नवीन वकिलांची नेमणूक केलेली आहे. सदावर्ते यांना पत्र दिलं आहे..

आता आम्ही नवीन वकिल सतिश पेंडसे यांना वकील म्हणून नेमलं आहे. न्यायालय जो निर्णय देईल तो दोन्ही बाजूच्या लोकांना मान्य असेल. सर्व कर्मचाऱ्यांनी ताबडतोब सेवेत दाखल व्हावे, असं आवाहन अजय कुमार गूजर यांनी केलं. 'मी कामगारांनी आवाहन करतो. पोटाला जात धर्म नसतो, कामगारांनी शहाणं होणे गरजेचे आहे. दोन्ही नेत्यांनी विश्वास दिला आहे. कामगारांच्या पाठीशी कदापी खंजीर खुपसणार नाही, कोणावरही अन्याय होणार नाही, असं आवाहन मनसे संघटनेचे नेते माळी यांनी केलं.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी