SSC and HSC Exam Big News : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी,  परिक्षेचा तो वेळ होणार कमी

 SSC and HSC Exam News : यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना दहा मिनिटं गमवावी लागणार आहे. पूर्वी परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटं अगोदर विद्यार्थ्यांना पेपर दिला जात होता.

maharashtra state board ssc Hsc exam 2023 board gave explanation about 10 minutes reduce in exam read in marathi
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी 
थोडं पण कामाचं
  • यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना दहा मिनिटं गमवावी लागणार आहे.
  • पूर्वी परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटं अगोदर विद्यार्थ्यांना पेपर दिला जात होता.
  • वाढत्या पेपरफुटीच्या घटनांमुळे आता ही पद्धत बंद केली जाणार आहे.

SSC and HSC Exam News :  मुंबई : यंदा दहावीची दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना 10 मिनिटं वेळ वाढवून द्या अशी मागणी मुख्याध्यापकांनी केली होती. याआधी पेपर फुटणे टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू झाल्यावरच पेपर वाटण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना वेळ कमी मिळेल, त्यामुळे त्यांना पुढील 10 मिनिट वाढवून द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. तसेच बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना दहा मिनिटं कमी मिळतील असे म्हणण्यात आले होते. मात्र आता यावर खुद्द बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी खुलासा केला आहे. (maharashtra state board ssc Hsc exam 2023 board gave explanation about 10 minutes reduce in exam read in marathi)

यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना दहा मिनिटं गमवावी लागणार आहे. पूर्वी परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटं अगोदर विद्यार्थ्यांना पेपर दिला जात होता. वाढत्या पेपरफुटीच्या घटनांमुळे आता ही पद्धत बंद केली जाणार आहे. दहावीच्या परीक्षा वेळेत कुठेही कपात केली नसल्याचा खुलासा बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे.

निर्णय होता तरी काय

 यापूर्वी विद्यार्थ्यांना पेपर लिहायला सुरू करण्याआधी प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचता यावी, यासाठी जो 10 मिनिटांचा कालावधी दिला जायचा, त्याचा गैरवापर होऊन या कालावधीत पेपर फुटीचे प्रकार वाढू लागले होते.  ही दहा मिनिटे रद्द केल्याची माहिती गोसावी यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पहिल्या मिनिटाला हातात प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे. सकाळी 11 वाजताच्या पेपरला अर्धा तास आधी 10.30 वाजता तर दुपारी 3 वाजताच्या पेपरला 2.30 वाजता हजेरी लावावी लागणार आहे. 
 
 कॉपीमुक्त परीक्षा पॅटर्नचा एक भाग म्हणून ही पद्धत लागू करण्यात येणार असल्याचं शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले आहे. कॉपी परीक्षा पद्धतीला लागलेली कीड आहे. ही कीड मारुन टाकण्यासाठी परीक्षेचे दहा मिनिटं कमी करणं म्हणजे आजारापेक्षा इलाज भयानक असल्याचं पालकांचे म्हणणे आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी