राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर

मुंबई
Updated Oct 16, 2019 | 10:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एक आनंदाची बातमी मिळाली आहे. कारण, शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांसंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. 

maharashtra state government employees get october salary before diwali news marathi
मंत्रालय  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी
  • दिवळीपूर्वी मिळणार ऑक्टोबर महिन्याचा पगार
  • राज्य शासनाने परिपत्रक काढत घेतला महत्वपूर्ण निर्णय 

मुंबई: यंदाच्या वर्षी दिवाळी ही ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस आली आहे. महिना अखेरीस दिवाळी अल्याने अनेकांना खर्च कसा भागवायचा असा प्रश्न पडला होता. पण आता यावर शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच ऑक्टोबर महिन्याचा पगार देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ही दिवाळी ही दणक्यात साजरी करता येणार आहे. 

दिवाळी महिना अखेरीस आहे आणि हातात पैसे नसल्यास दिवाळी सण कसा साजरा करायचा असा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर होता. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याचा पगार दिवाळीपूर्वी करण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी केली होती. 

दिवाळी सण लक्षात घेऊन सरकारने ९ ऑक्टोबर रोजीच परिपत्रक काढून सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी पगार देण्याचं ठरवलं होतं. मात्र, पगार वितरण करणाऱ्या कोषागार या विभागातील कर्मचारी हे निवडणुकीच्या कामात गुंतले असल्याने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी पगार देणं शक्य नसल्याचं म्हटलं गेलं. यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. मात्र, आता राज्य सरकारने या प्रकरणी महत्वाचा निर्णय घेतला आहे. 

नुकतीच निवडणूक आयुक्त, राज्याचे मुख्य सचिव अयोज मेहता आणि राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांच्यात एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर कोषागार विभागातील कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून वगळण्यात आलं आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार २५ ऑक्टोबरपर्यंत करण्याचे आधेश देण्यात आले. 

राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये एक आनंदाचे वातावरण असून सर्वांची दिवाळी आता दणक्यात साजरी होणार आहे. राज्य सराकरी कर्मचाऱ्यांसोबतच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनाही दिवाळीपूर्वीच पगार मिळणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी