दहशतवाद्यांच्या निशाण्यावर महाराष्ट्र? खलिस्तानवाद्यांच नांदेड, मनमाडमध्ये स्लीपर सेल सक्रीय

मुंबई
भरत जाधव
Updated May 11, 2022 | 19:27 IST

महाराष्ट्रात (Maharashtra) घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांकडून(terrorists) केला जात असल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांच्या (Maharashtra Police) हाती लागली आहे. खलिस्तानवादी (Khalistani) दहशतवादी हरविंदर सिंह रिंदाशी संबंधित धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर हरियाणातील (Haryana) करनाल (Karnal) येथे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा महाराष्ट्र एटीएस (Maharashtra ATS) ताबा घेणार असल्याची माहिती आहे.

Maharashtra targeted by terrorists
खलिस्तानवाद्यांच नांदेड, मनमाडमध्ये स्लीपर सेल सक्रीय   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • नांदेड, मनमाड आणि नवी मुंबईवर सुरक्षा यंत्रणांची खास नजर आहे.
  • सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड ते पंजाब दरम्यानच्या अनेक भागांमध्ये खलिस्तानवाद्यांचे स्लीपर सेल आहे.

Khalistan Terrorist : महाराष्ट्रात (Maharashtra) घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांकडून(terrorists) केला जात असल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांच्या (Maharashtra Police) हाती लागली आहे. खलिस्तानवादी (Khalistani) दहशतवादी हरविंदर सिंह रिंदाशी संबंधित धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर हरियाणातील (Haryana) करनाल (Karnal) येथे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा महाराष्ट्र एटीएस (Maharashtra ATS) ताबा घेणार असल्याची माहिती आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड, मनमाड आणि नवी मुंबईवर सुरक्षा यंत्रणांची खास नजर आहे. या तीन भागांमध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांचे स्लीपर सेल सक्रिय झाले आहेत. या स्लीपर सेलच्या माध्यमातून सामान्य लोकांमध्ये ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड ते पंजाब दरम्यानच्या अनेक भागांमध्ये खलिस्तानवाद्यांचे स्लीपर सेल आहे. स्लीपर सेलच्या माध्यमातून युवकांना खलिस्तानी अजेंड्यासाठी तयार करत असल्याची माहिती समोर आली आहे. 

नवी मुंबईतील युवकावर लक्ष

नवी मुंबईत राहणारा एक युवक सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आला आहे. हा युवक शीख धर्मीय नसूनही शीख धर्माच्या प्रचार, प्रसाराच्या कामात असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याशिवाय, दिल्लीत झालेल्या शेतकरी आंदोलनात नवी मुंबईतील काही नागरिकांना घेऊन हा युवक आंदोलनात सहभागी झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी