लॉकडाऊन मागे घ्या, व्यापाऱ्यांनी दिला मुख्यमंत्री ठाकरेंना २४ तासांचा अल्टीमेटम

Maharashtra lockdown । ब्रेक दि चेन उपक्रमाचा एक भाग म्हणून, महाराष्ट्र सरकारने 30 एप्रिल पर्यंत सर्व जीवनावश्यक दुकाने, मॉल आणि बाजारपेठा बंद ठेवल्या आहेत, व्यापारी आता याला विरोध करताना दिसत आहेत. 

Maharashtra Traders body gives CM Uddhav Thackeray ultimatum to withdraw shutdown
व्यापाऱ्यांनी दिला मुख्यमंत्र्यांना अल्टीमेटम 

थोडं पण कामाचं

  • व्यापाऱ्यांनी 24 तास अल्टिमेटम दिला आहे, असहकाराचा आंदोलन करण्याचा इशारा
  • मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस मर्यादित काळासाठी दुकाने उघडी करण्याची शिफारस केली 
  • व्यवसायांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे आणि व्यापार करणे असुरक्षित बनत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे

मुंबई : सुमारे ७५० हून अधिक व्यापारी संघटनांची मुख्य संस्था असलेल्या फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (एफएएम) ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांना जीवनावश्यक दुकाने उघडण्यासाठी २४ तासांचा अल्टिमेटम दिला आहे.  या संस्थेची सदस्य संख्या जवळपास  २०,००,००० छोटे व्यावसायिक आहे. (Maharashtra Traders body gives CM Uddhav Thackeray ultimatum to withdraw shutdown)  

सोमवारी रात्रीपासून महाराष्ट्रात वाहतूक सेवा आणि जीवनावश्यक वस्तूंचा अपवाद वगळता जवळपास सर्व दुकानांना लॉकडाऊन करण्यात आली होते, त्याअंतर्गत सर्व जीवनावश्यक दुकाने सोडून इतर दुकाने, बाजारपेठा आणि मॉल 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यास सांगण्यात आले.

एफएएमचे अध्यक्ष विनेश मेहता म्हणाले, "गेल्या वर्षी लावण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर आम्ही आता कुठे सावरत होतो.  या नवीन निर्बंधांमुळे आता व्यवसाय संपण्याच्या मार्गावर आहे."

एफएएमने निर्णय घेतला आहे की जर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या 24 तासांच्या अल्टिमेटमकडे लक्ष न दिल्यास व्यापारी काळ्या पट्ट्या आणि मुखवटे घालून  दुकानांवर येतील आणि गुरुवारी दुपारी निषेध करतील.  हा सरकारी यंत्रणेला पुढील इशारा असणार आहे. 

"व्यापाऱ्यांना कामगारांचा पगार, कर, जीएसटी, भाडे द्यावे लागेल, पैसे कुठून येतील? सरकारने आमच्या निषेधाकडे लक्ष न दिल्यास आम्ही आपले आंदोलन अधिक  तीव्र करू," असे उपाध्यक्ष जितेंद्र शाह यांनी सांगितले.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता इतर दुकानांसाठी आठवड्यातून तास किंवा २ ते ३ दिवस दुकान उघडण्याची मुभा द्यावी.  छोटे दुकानदार पुढील तोटा सहन करू शकणार नाहीत.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सुचवले की हा लॉकडाऊनच आहे. पण त्याला वेगळे नाव दिले आहे. त्यामुळे ही अधिसूचना मागे घ्यावी.

"हे असेच चालू राहिले तर आत्महत्या करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरला नाही," मेहता यांनी उद्गार काढले. (Maharashtra Traders body gives CM Uddhav Thackeray ultimatum to withdraw shutdown)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी