Maharashtra unseasonal rain: राज्यात अवकाळी पावसाचं थैमान; शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

Rain in Maharashtra: राज्यातील विविध भागांत गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. 

Maharashtra weather forecast imd predicts intense thunderstorm in some districts read in marathi
Maharashtra unseaonal rain: राज्यातील विविध भागांत अवकाळी पाऊस, पुढील 3 तासांत 'या' भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज  
थोडं पण कामाचं
  • अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे त्वरित करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  • सरकार संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी : मुख्यमंत्री

Maharashtra News updates: राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (7 मार्च 2023) सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.

शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. सरकार संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. यादृष्टीने महसूल यंत्रणेने लगेच कामाला लागावे व पंचनामे करावेत असेही निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

हे पण वाचा : जास्त तहान लागणे आजारपणाचे लक्षण?

ठाणे, पालघरसह राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. वाशिम, नाशिक, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), पैठण, गंगापूर परिसरातील अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.

हे पण वाचा : Rang Panchami: रंगांची एलर्जी असल्यास काय करावे?

मुंबई, ठाण्यासह उत्तर-मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असल्याने बऱ्याच ठिकाणी आणखी अवकाळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत.

पुढील 24 तास महत्त्वाचे

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात येत्या 24 तासात उ.मध्य महाराष्ट्र, मरा़ठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलका/मध्यम पावसाची शक्यता आहे. सोबत ढगाळ आकाश, जोरदार वारे ही. ही स्थिती 7 मार्च ते 9 मार्च अपेक्षित. उद्या पासून (8 मार्च 2023) सुधाऱणा होण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा : स्वप्नात फळे दिसणे शुभ की अशुभ?

शेतीचे मोठे नुकसान

रविवारी रात्रीपासून राज्यातील विविध भागांत अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. काही भागात पावसासोबतच गारपीट सुद्धा झाली. या अवकाळी पावसामुळे कांदा, हरभरा, गहू तसेच इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. उन्हाळ्याच्या सुरुवातीला रब्बी हंगामातील पिके काढण्यात येतात मात्र, त्याचवेळी अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी