Maharashtra Voter ID: राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; मतदार ओळखपत्र आधार कार्डसोबत लिंक करणार

मुंबई
सुनिल देसले
Updated Jul 25, 2022 | 19:40 IST

Big decision of Maharashtra Election Commission: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काळात होणार आहेत. त्यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो 
थोडं पण कामाचं
  • राज्य निवडणूक आयोगाचा महत्त्वपूर्ण निर्णय
  • राज्यातील मतदारांचे मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड हे संलग्न करणार

Voter ID cards to be link with Aadhaar card in Maharashtra: राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) एक पत्रकार परिषद घेत महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आता महाराष्ट्रातील मतदारांचं वोटर आयडी (Voter ID) हे आधार कार्ड (Aadhaar Card)सोबत संलग्न केले जाणार आहे. यासाठी एक विशेष मोहीम हाती घेण्यात येणार असून येत्या १ ऑगस्टपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. (Maharashtra voter id cards to be linked with aadhaar card for this campaign will starts from august 1 said Chief Election Officer)

मतदारांची ओळख, मतदार यादीत असलेला घोळ, यादीत असलेली दुबार नावे यासोबतच इतर दोष आढळून येतात. हेच लक्षात घेता आता मतदार ओळखपत्र हे आधार कार्ड सोबत जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय निवडणूक आयोग १ ऑगस्टपासून संपूर्ण राज्यात मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक करण्याची मोहीम सुरू करणार आहे.

याच संदर्भात राज्यातील सर्व राजकीय पक्षांच्या सोबत एक बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत सर्व राजकीय पक्षांना आम्ही घेतलेल्या निर्णयाबाबत सविस्तर माहिती देणार आहोत. आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र संलग्न करताना आधार क्रमांक हा डिजिटल मास्किंग केला जाईल. तसेच कुणाचाही आधार कार्ड नंबर हा पब्लिक डोमेनमध्ये जाणार नाही याची विशेष खबरदारी घेतली जाणार आहे असंही श्रीकांत देशपांडे यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा : ठाणेकरांनो सावध व्हा, Swine Flu मुळे दोन महिलांचा मृत्यू

आधार कार्ड मतदार ओळखपत्राशी संलग्न करण्यासाठी मतदारांना अर्ज क्र. ६ ब भरायचा आहे. सदर अर्ज सर्व मतदार नोंदणी कार्यालयामध्ये, भारत निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ (https://eci.gov.in/) मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ (https://ceo.maharashtra.gov.in/) येथे उपलब्ध असेल. तसेच National Voter Service Portal या संकेतस्थळावर Voter Helpline APP वरही ऑनलाइन पद्धतीने आधार कार्ड संलग्न करून स्व-प्रमाणित करता येईल. हा अर्ज भरताना मतदाराला आधार कार्डाला संलग्न असलेल्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल. मात्र याप्रकारे संलग्नीकरण शक्य झाले नाही किंवा स्व-प्रमाणित करावयाचे नसल्यास, तर केवळ आधार कार्डाची छायांकित प्रत सादर करून स्व-प्रमाणित न करता मतदाराला स्वतःच्या मतदार ओळखपत्र आधारशी संलग्न करता येईल. तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरोघरी भेटी देऊन अर्ज क्र. ६ब भरून घेतील आणि त्यांचे संगणकीकरण केले जाईल. या मोहिमे अंतर्गत निवडणूक कार्यालयांकडून राज्यव्यापी विशेष शिबिरांचे आयोजनही केले जाणार आहे.

कार्यक्रमाचे उद्दिष्ट

लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम २३ मधील दुरुस्तीने स्पष्टपणे नमूद केले आहे की विद्यमान मतदारांकडून आधार संकलनाचा उद्देश खालील प्रमाणे आहे.

  1. मतदारांची ओळख प्रस्थापित करणे आणि
  2. मतदार यादीतील नोंदींचे प्रमाणीकरण करणे आणि
  3. एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदारसंघात एकाच व्यक्तीच्या नावाची नोदणी ओळखणे हा आहे.
  4. याद्वारे भविष्यात मतदारांना निवडणुकीसंदर्भातील सुविधा उपलब्ध करून देणे 
  5. सदर कार्यक्रमाचा उद्देश कायदेशीर तरतुदीस अनुसरून आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी