Maharashtra Weather Alert : थंडीच्या लाटेनं राज्यात हुडहुडी; तर मराठवाड्यात पाऊस आणि गारपीटची शक्यता

मुंबई
भरत जाधव
Updated Jan 13, 2022 | 09:45 IST

Weather Alert : भारतीय हवामान विभागाच्यावतीने (IMD) विदर्भ (Vidarbha) आणि मराठवाड्यातील (Marathwada) विविध ठिकाणी पुढील तीन दिवसात विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीट (Hail) होण्याची शक्यता वर्तवली आहे.

Weather Alert
थंडीच्या लाटेनं राज्यात हुडहुडी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • उत्तर भारतातील स्थिती आणि अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागारातील बदल्यात स्थितीचा महाराष्ट्रावर परिणाम
  • महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट पसरली असून आयएमडीनं विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे.
  • नंदुरबार जिल्ह्यात तापमान 7 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे.

Maharashtra Weather Update : मुंबई : भारतीय हवामान विभागाच्यावतीने (IMD) विदर्भ (Vidarbha) आणि मराठवाड्यातील (Marathwada) विविध ठिकाणी पुढील तीन दिवसात विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीट (Hail) होण्याची शक्यता वर्तवली आहे. आयएमडीनं उद्या विदर्भात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस (Unseasonal Rain) तर, काही ठिकाणी गारपीट होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात देखील पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्यातील इतर भागात थंडीने हुडहुडी भरली आहे. 

उत्तर भारतातील स्थिती आणि अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागारातील बदल्यात स्थितीचा महाराष्ट्रावर परिणाम दिसून येत आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट पसरली आहे. आयएमडीनं विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे. ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी याबाबत ट्विट केले आहे. नंदुरबार जिल्ह्यात तापमान 7 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागात थंडीची लाट कायम असल्याचे चित्र आहे. उत्तरेकडे आलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम राज्यात दिसून येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी पारा चांगलाच घसरला आहे.  साताऱ्यातील वेण्णा लेक परिसरात बुधवारी मध्यरात्री तापमान शून्य अंशांपर्यंत पोहोचले आहे. तर नाशिकमध्येसुद्धा पारा 10 अंशावर गेला आहे. निफाडमध्ये या पेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. 

नंदुरबारमधील थंड हवेचं ठिकाण अशी ओळख असलेल्या तोरणमाळमध्ये 7 अंश तापनाची नोंद झाली आहे.  तर धुळ्यात 6.8 अंश तापमानाची नोंद झाली आहे. नाशिकच्या निफाडमध्येही गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पारा 7 अंशांवर आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण भागावर थंडी पाहायला मिळत आहे. त्यात मिनी काश्मिर म्हणून जाणाऱ्या महाबळेश्वर वेण्णालेक मधील गेल्या तीन दिवसापासून तापमान मोठ्या प्रमाणात घसरल्याचा पाहायला मिळाले. 

मराठवाडा विदर्भात पावसाचा अंदाज

उत्तरेकडील पश्चिम विक्षोभ,अरबी समुद्रातून येणारी आर्द्रता व पुढील 4-5 दिवस अरबी व बंगालच्या उपसागरातून एकत्र येणारे वारे यांच्या प्रभावामुळे मध्य भारतात पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली होती. आज विदर्भातील नागपूर वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडयातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारा पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी