Maharashtra Weather Update: हिवाळी की पावसाळा, अनेक ठिकाणी बसल्या अवकाळी सरी, पुढील चार दिवस राहिल असे वातावरण

Rains in Many parts of Maharashtra :  17 नोव्हेंबरच्या आसपास अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे 15 ते 19 नोव्हेंबर दरम्यान राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Maharashtra Weather Update: राज्यात अवकाळी पावसाच्या सरी
maharashtra weather Department gave alert rainfall in some parts of maharashtra from 15th to 19th November 
थोडं पण कामाचं
  •  17 नोव्हेंबरच्या आसपास अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून माहिती देण्यात आली आहे.
  • 15 ते 19 नोव्हेंबर दरम्यान राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
  • हवामान शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली माहिती

Maharashtra Weather Update for Next 4 Days ।  मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना धडकी भरविणारी बातमी समोर येत आहे. पुढील चार दिवस पुन्हा अवकाळी पाऊस आपले रंग दाखविणार आहे. त्यामुळे या अवकाळी पावसामुळे शेतकरी दादाला आपल्या पीकांची चिंता सतावत आहे. (maharashtra weather Department gave alert rainfall in some parts of maharashtra from 15th to 19th November)

 नोव्हेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. या पावसाचा जोर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात होणार असल्याची शक्यताही वर्तविण्यात आली  आहे. हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे. 
 
 17 नोव्हेंबरच्या आसपास अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण  होणार असल्याचे हवामान खात्याकडून माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे 15 ते 19 नोव्हेंबर दरम्यान राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामान शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 ते 19 नोव्हेंबरपर्यंत राज्यात काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. पुढील तीन ते चार दिवस ढगाळ वातावरण राहून मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यात 15 नोव्हेंबर रोजी पाऊस पडेल. तर 16 नोव्हेंबर रोजी उस्मानाबादमध्ये पाऊस पडेल. 17 नोव्हेंबर रोजी लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, अशी शक्यता मराठवाड्यातील हवामान तज्ञ डॉ. के. के. डाखोरे यांनी व्यक्त केली आहे. 

पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीच्या पूर्वसंध्येला पावसाची हजेरी लागली होती त्यामुळे पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेनिमित्त जमलेल्या भाविकांनाही पावसामुळे अडचण निर्माण झाली. पंढरपूरसह आसपासच्या तालुक्यात अवकाळी पाऊस झाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी