Maharashtra Weather forecast: पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचे; 'या' जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट, पाहा तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती 

मुंबई
सुनिल देसले
Updated Jul 11, 2022 | 18:16 IST

Maharashtra Rain updates: राज्यात पावसाचा जोर कायम असल्याचं पहायला मिळत आहे. त्यातच आता हवामान विभागाने पुढील चार दिवसांत राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
  • राज्यात पावसाचा जोर कायम राहणार
  • पुढील चार दिवसांत राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा 

मुंबई : जून महिन्याच्या अखेर पासून सुरुवात झालेला पाऊस काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. राज्यातील अनेक भागांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली असल्याने पिण्याच्या पाण्याचा, शेतीसाठी आवश्यक पाण्याचा तुटवडा भासणार नाही. मात्र, नदी-नाले ओसंडून वाहत असल्याने अनेक ठिकाणी पूरसदृश्यस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता पुढील चार दिवस राज्यातील काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (IMD predicts heavy rainfall in some districts of Maharashtra in next 4 days)

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे पश्चिम किनाऱ्यावरील द्रोणिय स्थिती २०°N पूर्व-पश्चिम शियर, मान्सून ट्रफ त्याच्या सामान्य स्थितीच्या दक्षिणेकडे स्थित आहे. परिणामी या ४-५ दिवसात कोकण (मुंबई ठाण्यासह), मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी मुसळधार‌ पाउस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यातही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे.

कुठल्या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट 

१२ जुलै

रेड अलर्ट - पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे, नाशिक, गडचिरोली

ऑरेंज अलर्ट - मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा, औरंगाबाद, जालना, चंद्रपूर

१३ जुलै 

रेड अलर्ट - पालघर, रायगड, नाशिक, पुणे

ऑरेंज अलर्ट - मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, अकोला, अमरावती, नागपूर 

१४ जुलै 

रेड अलर्ट - पालघर, नाशिक, पुणे 

ऑरेंज अलर्ट - मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा 

१५ जुलै 

ऑरेंज अलर्ट - पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक 

हे पण वाचा : पर्यटकांच्या गाडीवर कोसळली दरड; घटना CCTV मध्ये कैद

पुढील हवामानाचा अंदाज आणि इशारा 

१२ जुलै 

कोकण - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी अतिवृष्टीसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मराठवाडा - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

विदर्भ - बहुतांश टिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. 

पुणे आणि आसपासच्या परिसरात हवामानाचा अंदाज 

१२ जुलै - आकाश संपूर्णत: ढगाळ राहून मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. (घाटात जोरदार पाऊस ते तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.)

१३ जुलै - आकाश संपूर्णत: ढगाळ राहून मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. (घाटात जोरदार पाऊस ते तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी