मुंबई : जून महिना संपत आला होता तरी राज्यात हवा तसा पाऊस बरसत नव्हता आणि त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली होती. पण जून महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्राच्या जवळपास सर्वच भागांत पावसाने एन्ट्री केली आणि अख्खा महाराष्ट्र मान्सूनने व्यापला. राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस (Heavy to Heavy rainfall in some districts of Maharashtra) पडत आहे आणि त्यातच आता हवामान विभागाने (IMD) पुढील चार दिवसांत काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. (IMD predict heavy rain fall in some districts of Maharashtra for next 4 days)
उत्तर ओडिशा आणि लगतच्या दक्षिण झारखंडवर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. त्याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रातील पावसावर होणार आहे. पुढील चार दिवसांत राज्याच्या काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना यल्लो अलर्ट देण्यात आला आहे.
4 Jul: पुढील 5 दिवसांत मध्य भारत,पश्चिम किनारपट्टीवर सक्रिय मान्सूनची स्थिती. — K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 4, 2022
मान्सून TROUGH सक्रिय,पश्चिम किनारपट्टीवरील जोरदार वारे.
कमी दाबाचे क्षेत्र उत्तर ओडिशा व लगतच्या दक्षिण झारखंड व GWB वर.
याचा परिणामी महाराष्ट्रात येत्या ५ दिवसात पावसाचा इशारा.
TC,watch IMD pl
1/2 pic.twitter.com/B2XLShlrrK
ऑरेंज अलर्ट - रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर
यल्लो अलर्ट - मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, कोल्हापूर, संभाजीनगर, बुलढाणा, जालना, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, हिंगोली, वाशिम, परभणी, नांदेड, लातूर, धाराशीव.
हे पण वाचा : १०६ चा मुख्यमंत्री होत नाही आणि ३९ चा मुख्यमंत्री होतो यात काळंबेरं आहे - अजित पवार
ऑरेंज अलर्ट - पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
यल्लो अलर्ट - मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, हिंगोली, परभणी, नांदेड
ऑरेंज अलर्ट - पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
यल्लो अलर्ट - मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, हिंगोली, परभणी, नांदेड
2/2: — K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 4, 2022
पाचव्या दिवशी पावसाचा इशारा; 8 जुलै pic.twitter.com/BdHM2hMX7T
ऑरेंज अलर्ट - पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर.
यल्लो अलर्ट - मुंबई शहर, मुंबई उपगनर, ठाणे, नंदुरबार, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.