Maharashtra rain news: गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा सक्रिय होताना दिसत आहे. राज्यातील काही भागांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यासोबतच पुढील पाच दिवस राज्यभरात मान्सून सक्रिय होऊन काही भागांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (Maharashtra Weather Forecast imd predict heavy to heavy rainfall in some district read details)
भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक आणि पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत माहिती दिली, "राज्यात 5 दिवस मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असून मुसळधार ते अतिमुसळधारची शक्यता.काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता. २४ तासांत दक्षिण कोकण,दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार,मेघगर्जनेची शक्यता."
5 Aug; राज्यात 5 दिवस मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असून मुसळधार ते अतिमुसळधारची शक्यता.काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता. — K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 5, 2022
खाली दिलेले इशारे शनिवार पासून आहेत.
२४ तासांत दक्षिण कोकण,दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार,मेघगर्जनेची शक्यता. pic.twitter.com/4MqJ0qrUaR
6 ऑगस्ट रोजी
ऑरेंज अलर्ट - रायगड, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर
यल्लो अलर्ट - ठाणे, पालघर, नाशिक, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड
अधिक वाचा : मुंबै सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी प्रविण दरेकर
७ ऑगस्ट रोजी
ऑरेंज अलर्ट - नाशिक, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, गडचिरोली
यल्लो अलर्ट - पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, वाशिम, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ.
अधिक वाचा : Shiv Sena BJP yuti: ठाकरेंनी केली हातमिळवणीची तयारी पण १२ आमदार आणि राणेंमुळे झाली बिघाडी
८ ऑगस्ट रोजी
ऑरेंज अलर्ट - नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, गोंदिया चंद्रपूर
यल्लो अलर्ट - नंदुरबार, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर
९ ऑगस्ट रोजी
ऑरेंज अलर्ट - मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, औरंगाबाद, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.
यल्लो अलर्ट - नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, वर्धा, नागपूर
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.