Maharashtra Weather forecast: पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचे, 'या' जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार बरसणार

मुंबई
सुनिल देसले
Updated Aug 02, 2022 | 15:43 IST

Maharashtra rain updates: राज्यात पुढील पाच दिवसांत विविध भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो 
थोडं पण कामाचं
 • येत्या ५ दिवसांत राज्याच्या अंतर्गत भागात विजांच्या कडकडाटासह गडगडाट होण्याची शक्यता
 • राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra rain imd alert and havaman updates: जून महिन्याच्या शेवटी पावसाने जोरदार बरसायला सुरुवात केली साधारणत: आठ-दहा दिवस पावसाचा जोर हा कायमच होता. या काळात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागले, धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली तर अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली. त्यानंतर दडी मारलेला पाऊस आता पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे. पुढील पाच दिवसांत राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Maharashtra weather forecast imd predicts heavy rain in some areas of state konkan madhya maharashtra havaman updates)

भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक आणि पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत माहिती दिली की, "येत्या ५ दिवसांत राज्याच्या अंतर्गत भागात विजांच्या कडकडाटासह गडगडाट होण्याची शक्यता आहे. तसेच तिसऱ्या दिवसापासून कोकण आणि मध्य महाराष्ट्र घाट परिसरात, काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे."

२ जुलै - खालील जिल्ह्यांना यल्लो अलर्ट

नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली

३ जुलै - खालील जिल्ह्यांना यल्लो अलर्ट

नाशिक, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना

अधिक वाचा : Shocking! पुराच्या पाण्यात गाडी गेली वाहून, LIVE VIDEO आला समोर

४ जुलै - खालील जिल्ह्यांना यल्लो अलर्ट

नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, पुणे, सांगली, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, वाशिम, औरंगाबाद, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, 

५ जुलै - खालील जिल्ह्यांना यल्लो अलर्ट

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा

अधिक वाचा : Please slow down : चिखलातून वेगाने गाडी चालवणाऱ्यांनो, जरा विचार करा! या मुलीचा फोटो पाहून वाटेल वाईट!

६ जुलै - खालील जिल्ह्यांना यल्लो अलर्ट

ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, परभणी, हिंगोली, नांदेड, गोंदिया, गडचिरोली

पुढील हवामानाचा अंदाज आणि इशारा 

३ ऑगस्ट 

 1. कोकण - बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. 
 2. मध्य महाराष्ट्र - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता. 
 3. मराठवाडा - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता. 
 4. विदर्भ - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. 

४ ऑगस्ट 

 1. कोकण - बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. दक्षिण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता. 
 2. मध्य महाराष्ट्र - बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता. 
 3. मराठवाडा - बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता. 
 4. विदर्भ - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. 

५ ऑगस्ट 

 1. कोकण - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. दक्षिण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता. 
 2. मध्य महाराष्ट्र - बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. 
 3. मराठवाडा - बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता. 
 4. विदर्भ - बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी