Maharashtra Weather Forecast: पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचे; 'या' जिल्ह्यांत जोरदार बरसणार, पाहा तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती

मुंबई
सुनिल देसले
Updated Jul 06, 2022 | 16:23 IST

Maharashtra Rain updates: मुंबई, कोकणासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. 

Maharashtra Weather Forecast imd predicts heavy rainfall in konkan in next 4 to 5 hours also predict heavy rain for next 5 days in some districts of state
Maharashtra Weather Forecast: पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचे; 'या' जिल्ह्यांत जोरदार बरसणार, पाहा तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती 
थोडं पण कामाचं
  • पुढील 4 ते 5 दिवस राज्यात मान्सून सर्वाधिक राहण्याची शक्यता
  • पावसाचा जोर आणखी चार ते पाच दिवस कायम राहण्याची शक्यता असून काही जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई : राज्यात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस (heavy rainfall) सुरू आहे. मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी साठ्यात वाढ होत आहे. मात्र, त्याच दरम्यान अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती (flood situation due to heavy rain) निर्माण झाली आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरातही मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याचं पहायला मिळालं. तर कोकण, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतही पावसामुळे नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत. त्यातच आता पुढील चार ते पाच दिवस काही जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोकणात मध्यम ते मधूनमधून तीव्र सरी कोसळत आहेत; पालघर, मुंबई ठाणे रायगड पुढील ३, ४ तास अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकणातही अशीच परिस्थिती आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही मुसळधार पावसासाठी लक्ष ठेवावे लागेल.

पुढील 4-5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार ते पाच दिव मान्सून राज्यात सर्वाधिक सक्रिय राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यातही काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

पुढील पावसाचा अंदाज 

6 जुलै 

रेड अलर्ट - रायगड, रत्नागिरी, सातारा

ऑरेंज अलर्ट - मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, पुणे, सिंधुदुर्ग, गडचिरोली

यल्लो अलर्ट - नाशिक, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, हिंगोली, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, परभणी, वाशिम

7 जुलै 

रेड अलर्ट - रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे 

ऑरेंज अलर्ट - मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, नाशिक, चंद्रपूर 

यल्लो अलर्ट - औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, वाशिम, जालना, भंडारा, गोंदिया, गडचिरोली 

हे पण वाचा : शिंदे-पवारांची खरंच भेट झाली?जाणून घ्या VIRALफोटो मागचं सत्य 

8 जुलै 

रेड अलर्ट - पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर

ऑरेंज अलर्ट - मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, ठाणे 

यल्लो अलर्ट - नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, लातूर

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी