Maharashtra Rain updates: पुढील चार दिवस मुसळधार पावसाचे, ६ ऑगस्टला 'या' भागात अतिवृष्टीची शक्यता

मुंबई
सुनिल देसले
Updated Aug 04, 2022 | 13:02 IST

Maharashtra Weather forecast and rain updates: राज्यात पुढील चार दिवसांत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 

maharashtra weather forecast imd predicts heavy rainfall in next day konkan madhya maharashtra vidarbha rain news
Maharashtra Rain updates: पुढील चार दिवस मुसळधार पावसाचे, ६ ऑगस्टला 'या' भागात अतिवृष्टीची शक्यता (प्रातिनिधिक फोटो)  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता 
  • तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
  • दक्षिण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता

Mumbai Maharashtra rain updates: जूनच्या अखेरच्या आठवड्यात आणि जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील विविध भागांत जोरदार पाऊस बरसला. या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली. मात्र, आता गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि परिसरात पावसाने सुरुवात केली आहे. त्यातच आता पुढील चार दिवसांत जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. (Maharashtra weather forecast imd predicts heavy rainfall in next day konkan madhya maharashtra vidarbha rain news)

६ आणि ७ ऑगस्टला या भागात अतिवृष्टी

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, ६ ऑगस्ट आणि ७ ऑगस्ट रोजी कोकणातील काही भागांत जोरदार पाऊस तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यासोबतच किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

पुढील हवामानाचा अंदाज आणि इशारा

४ ऑगस्ट 

कोकण - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. 

मध्य महाराष्ट्र - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

मराठवाडा - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाट होण्याची शक्यता आहे.

विदर्भ - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाट होण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा : Rain in Maharashtra : राज्यात मुसळधार पावसामुळे आतापर्यंत २८ जिल्ह्यांना फटका, ११० जणांचा मृत्यू;  NDRF & SDRF च्या १४ तुकड्या तैनात

५ ऑगस्ट 

कोकण - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. 

मध्य महाराष्ट्र - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

मराठवाडा - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता. 

विदर्भ - बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा : Samruddhi Mahamarg : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा पूर्ण, या दिवशी उद्घाटन होण्याची शक्यता

६ ऑगस्ट 

कोकण - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. काही ठिकाणी जोरदार पाऊस तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. 

मध्य महाराष्ट्र - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मराठवाडा - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भ - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा : Chandrapur : वीज कोसळून चार शेतकरी महिलांचा मृत्यू

७ ऑगस्ट 

कोकण - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. काही ठिकाणी जोरदार पाऊस तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. 

मध्य महाराष्ट्र - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मराठवाडा - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. 

विदर्भ - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी हवामानाचा अंदाज

४ ऑगस्ट - आकाश सामान्यत: ढगाळ राहण्याची आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. (घाटात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता)

५ ऑगस्ट - आकाश सामान्यत: ढगाळ राहण्याची आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. (घाटात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता)

६ ऑगस्ट - आकाश सामान्यत: ढगाळ राहण्याची आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. (घाटात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी