Maharashtra Weather forecast: राज्यातील 'या' भागांत उद्या मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह बरसणार पाऊस

मुंबई
सुनिल देसले
Updated Jul 28, 2022 | 20:38 IST

Maharashtra Rain updates: राज्यातील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याचं पहायला मिळत आहे. मुसळधार पाऊस बरसल्यानंतर आता विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा बरसणार आहे. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो 
थोडं पण कामाचं
  • विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा जोरदार बरसणार 
  • राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार

Maharashtra rain news: राज्याच्या विविध भागांत गेल्या १५-२० दिवसांत मुसळधार पाऊस बरसला. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी-नाले ओसंडून वाहू लागले. इतकेच नाही तर काही भागांत तर अक्षरश: पूरस्थिती निर्माण झाली. त्यानंतर पावसाने काही काळ विश्रांती घेतल्याचं पहायला मिळत आहे. गुरुवारी (२८ जुलै) मुंबई, ठाणे परिसरात तर अगदी उन्हाळ्याप्रमाणे कडाक्याचे ऊन पडल्याचं दिसून आलं. विश्रांती घेतलेला हा पाऊस आता पुन्हा बरसण्यासाठी सज्ज झाला आहे. कारण, राज्यातील काही भागांत शुक्रवारी (२९ जुलै) जोरदार पाऊस पडण्याता अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (Maharashtra Weather forecast imd predicts heavy rainfall in some area of state on july 29 read full details)

पुढील हवामानाचा अंदाज

२९ जुले 

  1. कोकण - बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 
  2. मध्य महाराष्ट्र - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. 
  3. मराठवाडा - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता. 
  4. विदर्भ - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा : Nagpur : रेल्वेतून नळ चोरणारी टोळी गजाआड,  हजारो नळ झाले लंपास

३० जुलै

  1. कोकण - बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 
  2. मध्य महाराष्ट्र - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 
  3. मराठवाडा - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 
  4. विदर्भ - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा : OBC Reservation: 'कोर्टाच्या भूमिकेचं आश्चर्य वाटतंय', उपमुख्यमंत्री फडणवीस असं का म्हणाले?

पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी हवामानाचा अंदाज

२९ जुलै - आकाश सामान्यत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

३० जुलै - आकाश अंशत: ढगाळ राहून दुपारी किंवा संध्याकाळी सामान्यत: ढगाळ राहण्याची आणि अति हलक्या ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यात एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात

राज्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

मुंबई (कांजूरमार्ग - १, घाटकोपर - १) - २

पालघर - १

रायगड (महाड - १) 

ठाणे - २ 

रत्नागिरी (चिपळूण - २) 

कोल्हापूर - २ 

सातारा - १ 

नांदेड - १, गडचिरोली - १ असे एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच एसडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी