Maharashtra Weather Forecast: राज्यातील 'या' जिल्ह्यांत पुढील ३ - ४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई
सुनिल देसले
Updated Mar 24, 2021 | 17:13 IST

Maharashtra Weather updates and warning: राज्यातील काही जिल्ह्यांत पुढील तीन ते चार तासांत जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Rain updates
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

 • राज्यातील काही भागांत सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज
 • सातारा, पुणे, नाशिक, धुळे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत पुढील ३ ते ४ तासांत जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यातील विविध भागांत गेल्या अनेक दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याचं पहायला मिळत असून अनेक जिल्ह्यांत सोसाट्याच्या वाऱ्यासह, गारपीट झाली. त्यातच आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत जोरदार वाऱ्यासह, अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अवकाळी पावसामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अद्यापही पावसाचा जोर कायम असल्याचं दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. (Maharashtra Weather Forecast thunderstorm with lightning rain likely to occur in satara pune nashik dhule kolhapur)

आयएमडी मुंबईने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सातारा (Satara), पुणे (Pune), नाशिक (Nashik), धुळे (Dhule) आणि कोल्हापूर (Kolhapur) या जिल्ह्यांत पुढील ३ ते ४ तासांत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागात गरपीट होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

विदर्भातील हवामानाचा अंदाज

 1. नागपूर - एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना.
 2. वर्धा - एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना.
 3. भंडारा - एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना.
 4. गोंदिया - एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी वारा (वेग ३०-४० किमी प्रति तास).
 5. चंद्रपूर - एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना.
 6. अमरावती - एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना.
 7. अकोला - एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना.
 8. यवतमाळ - एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना.
 9. बुलढाणा - एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना.
 10. वाशिम - एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना.

कोकण, गोव्याच्या तुरळक भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या बऱ्याच भागात लक्षणीय घट तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास आहे. 

पुणे आणि आसपासच्या परिसरातील हवामानाचा अंदाज

 1. २४ मार्च - आकाश अंशत: ढगाळ राहून संध्याकाळी आकाश सामान्यत: ढगाळ राहण्याची व मेघगर्जनेसह, विजांचा कडकडाट व हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता. 
 2. २५ मार्च - आकाश मुख्यत: निरभ्र राहून संध्याकाळी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता. 
 3. २६ मार्च - आकाश मुख्यत: निरभ्र राहून संध्याकाळी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी