पुढील चार दिवस पावसाचे, 'या' जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याचा अंदाज

मुंबई
सुनिल देसले
Updated Mar 19, 2021 | 14:57 IST

Weather warning issued by IMD in Maharashtra: राज्यातील विविध भागांत अवकाळी पाऊस पडत असून पुढील चार दिवसही अशाच प्रकारे अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 

Rain
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात बदल झाल्याचं पहायला मिळत असून अनेक जिल्ह्यांत अवकाळी पाऊस पडत आहे. केवळ पाऊसच नाही तर मेघगर्जनेसह गारपीट सुद्धा होत असल्याचं पहायला मिळत आहे. त्यातच आता पुढील चार दिवस महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत मेघगर्जनेसह, गारपीट तसेच जोरदार वारे वाहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (Maharashtra Weather Forecast warning for five days thunderstorm with lightning rain likely to occur in some districts)

हवामान खात्याने १९ मार्च २०२१ रोजी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. यामध्ये नाशिक, धुळे, जळगाव, पुणे, अमहदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांचा समावेश आहे. पाहुयात हवामान विभागाने वर्तवलेल्या पुढील काही दिवसांचा हवामान अंदाज.

पुढील हवामानाचा अंदाज आणि इशारा (१९ मार्च २०२१)

 1. कोकण - हवामान कोरडे राहण्याची शक्यता
 2. मध्य महाराष्ट्र - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. 
 3. मराठवाडा - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह गारा पडण्याची शक्यता. 
 4. विदर्भ - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह गारा आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता. 

पुढील हवामानाचा अंदाज आणि इशारा (२० मार्च २०२१)

 1. कोकण - हवामान कोरडे राहण्याची शक्यता
 2. मध्य महाराष्ट्र - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. 
 3. मराठवाडा - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह गारा पडण्याची शक्यता. 
 4. विदर्भ - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता. 

पुढील हवामानाचा अंदाज आणि इशारा (२१ मार्च २०२१)

 1. कोकण - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. 
 2. मध्य महाराष्ट्र - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. 
 3. मराठवाडा - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाट होण्याची शक्यता. 
 4. विदर्भ - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. 

पुढील हवामानाचा अंदाज आणि इशारा (२२ मार्च २०२१)

 1. कोकण - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. 
 2. मध्य महाराष्ट्र - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
 3. मराठवाडा - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाट होण्याची शक्यता. 
 4. विदर्भ - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. 

विदर्भातील हवामानाचा अंदाज आणि इशारा

१९ मार्च २०२१ 

 1. नागपूर - एक-दोन ठिकाणी विजांचा कडकटासह मेघगर्जना, गारा आणि वादळी वारा (वेग ३०-४० किमी प्रति तास).
 2. वर्धा - एक-दोन ठिकाणी विजांचा कडकटासह मेघगर्जना, गारा आणि वादळी वारा (वेग ३०-४० किमी प्रति तास).
 3. भंडारा - एक-दोन ठिकाणी विजांचा कडकटासह मेघगर्जना, गारा आणि वादळी वारा (वेग ३०-४० किमी प्रति तास).
 4. गोंदिया - एक-दोन ठिकाणी विजांचा कडकटासह मेघगर्जना, गारा आणि वादळी वारा (वेग ३०-४० किमी प्रति तास).
 5. चंद्रपूर - एक-दोन ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना.
 6. गडचिरोली - एक-दोन ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना.
 7. अमरावती - एक-दोन ठिकाणी विजांचा कडकटासह मेघगर्जना, गारा आणि वादळी वारा (वेग ३०-४० किमी प्रति तास).
 8. अकोला - एक-दोन ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना.
 9. यवतमाळ - एक-दोन ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना.
 10. बुलढाणा - एक-दोन ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना.
 11. वाशिम - एक-दोन ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना.

२० मार्च २०२१ 

 1. नागपूर - एक-दोन ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना.
 2. वर्धा - एक-दोन ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना.
 3. भंडारा - एक-दोन ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना.
 4. गोंदिया - एक-दोन ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना.
 5. चंद्रपूर - एक-दोन ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना.
 6. गडचिरोली - एक-दोन ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना.
 7. अमरावती - हल्का ते मध्यम पावसाचा अंदाज 
 8. अकोला - हल्का ते मध्यम पावसाचा अंदाज 
 9. यवतमाळ - एक-दोन ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना.
 10. बुलढाणा - हल्का ते मध्यम पावसाचा अंदाज
 11. वाशिम - हल्का ते मध्यम पावसाचा अंदाज

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी