Maharashtra Weather rain forecast update : विजांच्या कडकडाटासह राज्यात आणखी दोन दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यता

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 23, 2021 | 11:12 IST

Maharashtra Weather rain forcast update :राज्यात आणखी दोन दिवस पावसाची शक्यता आहे. राज्यात गेले दोन दिवस ढगाळ वातावरण (Cloudy weather) होते. तसेच काही ठिकाणी जोरदार पाऊस (Heavy rain)झाला. आता राज्यात पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवली आहे.

Maharashtra Weather rain forcast update, Heavy rain in next two days
राज्यात आणखी दोन दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यता  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज
  • पूर्व मध्य अरबी समुद्र ते महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

Maharashtra Weather rain forcast update : मुंबई : राज्यात आणखी दोन दिवस पावसाची शक्यता आहे. राज्यात गेले दोन दिवस ढगाळ वातावरण (Cloudy weather) होते. तसेच काही ठिकाणी जोरदार पाऊस (Heavy rain)झाला. आता राज्यात पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवली आहे. कोकण(Konkan), मध्य महाराष्ट्र(Central Maharashtra), मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  

पूर्व मध्य अरबी समुद्र ते महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊस कोसळणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर कोकणातही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे राज्यात पुढील 24 तासांत पावसाळी परिस्थती कायम राहणार आहे. 

दरम्यान, राज्यात कोसळणाऱ्या पावसामुळे वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत शेकडो क्विंटल सोयाबीन भिजले आहे. शेतकऱ्यांचा विकायला आणलेला सोयाबीन उघड्यावरच ठेवलेला होता. ओट्यावर ठेवलेला काही शेतकऱ्याचा माल पावसात वाहून गेला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी