Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील या जिल्ह्यात चार ते सहा मार्चदरम्यान पावसाचा अंदाज

मुंबई
भरत जाधव
Updated Mar 03, 2023 | 13:09 IST

Maharashtra Weather Update in Marathi: राज्यातील वातावरणात सातत्याने बदल (Climate change)होत आहेत. पहाटे थंडीचा कडाका तर दुपारी उन्हाचा चटका लागत आहे, अशात उद्यापासून (4 मार्च) ते 6 मार्चपर्यंत काही ठिकाणी पावसाची (Rain)शक्यता हवामान विभागाने(India Meteorological Department)वर्तवली आहे.

 Rain is forecast for this district of Maharashtra from March 4 to 6
राज्यातील या जिल्ह्यात पावसाची शक्यता  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • उन्हाळा सुरू होण्याआधीच पाऊस हजेरी लावण्याची शक्यता
  • रविवार आणि सोमवारी विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता
  • धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक येथे हलक्या सरीसह मेघगर्जनेचा अंदाज

Maharashtra Weather Update in Marathi: राज्यातील वातावरणात सातत्याने बदल (Climate change)होत आहेत. पहाटे थंडीचा कडाका तर दुपारी उन्हाचा चटका लागत आहे, अशात उद्यापासून (4 मार्च) ते 6 मार्चपर्यंत काही ठिकाणी पावसाची (Rain)शक्यता हवामान विभागाने(India Meteorological Department)वर्तवली आहे. कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या शनिवारपासून उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी तर रविवार आणि सोमवारी विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच याचाच परिणाम उत्तर कोकणावरही अपेक्षित आहे.  (Maharashtra Weather : Rain is forecast for this district of Maharashtra from March 4 to 6 )

अधिक वाचा  : कमी बजेटमध्ये सोलो ट्रिप कशी करणार?

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पारा चाळीशी जवळ पोहोचला होता. त्यामुळे यंदा उष्णतेची लाट येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण उन्हाळा सुरू होण्याआधीच पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार उद्यापासून पुढील तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईमध्ये ढगाळलेले आभाळ दिसू लागले आहे. तसेच पूर्वेकडून येणारे वारे आणि उत्तर-दक्षिण ढगांची द्रोणीय स्थिती यामुळे राज्यात काही भागांमध्ये ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 

अधिक वाचा  :  मुलं असं करत असतील तर प्रेमात तुमचाही दिग्यासारखा गेम होणार

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार शनिवार आणि रविवारी धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक येथे हलक्या सरीसह मेघगर्जनेचा  अंदाज आहे. अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यांमध्येही रविवारी आणि सोमवारी हलक्या सरींची शक्यता आहे. सोमवारी ठाणे जिल्ह्यातही हलक्या स्वरुपातील पाऊस पडू शकतो.

अधिक वाचा  : संयुक्त कुटुंबात असताना पतीसोबत कसा कराल रोमान्स

तर मुंबईमध्ये मात्र ढगाळ वातावरण आहे परंतु अद्याप पावसाचा अंदाज वर्तवलेला नाही. रविवार आणि सोमवार या दोन दिवसांमध्ये मराठवाड्यात औरंगाबाद आणि जालनामध्येही पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. सहा मार्च रोजी विदर्भात सर्वत्र पाऊस होऊ शकतो, असा अंदाज आहे.  

तर 5 मार्च रोजी नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाण्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर कोकणमध्ये देखील पावसाची शक्यता कायम आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी