Maharashtra Weather : अरे या, हवामानाचं चाललंय काय! काही ठिकाणी तापमानाचा पारा चढणार तर इतर ठिकाणी पाऊस

मुंबई
भरत जाधव
Updated Mar 09, 2023 | 08:48 IST

Maharashtra Weather update राज्यात अवकाळी पाऊस( Unseasonal rain) तसेच गारपिटीने उन्हाचा पारा थोडा घसरला आहे. पण येत्या काही दिवसांत ही परिस्थिती बदलणार असून पारा उसळी घेणार आहे. तापमानामध्ये ( Temperature) 3 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather :  Temperature will rise in some places and rain in other places
Maharashtra Weather : राज्यातील काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी तापमानात वाढ   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अवकाळी पावसामुळे राज्यातील 13 हजार 729 हेक्टरील पिकांचे नुकसान
  • कोकणात एकिकडे तापमानात वाढ होईल, तर काही भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता
  • मध्य महाराष्ट्रातील तापमानात तब्बल 6 अंशांची वाढ अपेक्षित आहे

Maharashtra Weather update : मुंबई  :  राज्यात अवकाळी पाऊस( Unseasonal rain) तसेच गारपिटीने उन्हाचा पारा थोडा घसरला आहे. पण येत्या काही दिवसांत ही परिस्थिती बदलणार असून पारा उसळी घेणार आहे. तापमानामध्ये ( Temperature) 3 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई, कोकण, गोवा महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात दिवसाच्या कमाल तापमानात ही वाढ नोंदवली जाईल. मुंबई-कोकणपट्ट्यात तर उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती उद्भवू शकते, असा इशाराच देण्यात आला आहे. (Temperature will rise in some places and rain in other places)

अधिक वाचा  : रिलेशनशिपमध्ये या गोष्टी कधीच खपवून घ्यायच्या नाहीत

कोकणात एकिकडे तापमानात वाढ होईल, तर काही भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. ज्यामुळे काजू, आंबा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या अवकाळी पावसाचा फटका फळं आणि भाज्यांवर होणार असल्यामुळं आर्थिक नुकसानही ओढावणार आहे.  दरम्यान  एक दोन दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपीटामुळे  शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झाले आहे. 

अधिक वाचा  : स्वप्नात आपल्या प्रेयसी किंवा प्रियकराला पाहून शुभ की अशुभ

नाशिकमध्ये सलग चौथ्या दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी लावली होती, या पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठं नुकसान झाले आहे. तसेच नाशिक तालुक्यातील बेळगांव ढगा परिसरात गारपीट झाल्याने निर्यातक्षम द्राक्षाला मोठा फटका बसला. अवकाळी पावसामुळे राज्यातील 13 हजार 729 हेक्टरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यात आठ जिल्ह्यात या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

अधिक वाचा  : नोकरी करणाऱ्या महिलांसाठी फिटनेस टिप्स

कोकणावर पावसाचे ढग असतानाच विदर्भात मात्र आकाश निरभ्र राहील असा अंदाज वर्तण्यात येत आहे. पण विदर्भातील काही जिल्हे याला अपवाद ठरतील. कारण, या जिल्ह्यांमध्ये 10 मार्चलाही पावसाच्या सरी बरसतील. मध्य महाराष्ट्रातील तापमानात तब्बल 6 अंशांची वाढ अपेक्षित आहे ज्यामुळं उकाडा आणखी वाढेल.

देशातील अनेक राज्यांमध्येही पावसाची हजेरी 

हवामान विभागाच्या अंदाजानुसार मध्य प्रदेशचा उत्तर भाह, पूर्व राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी असेल. तर, पश्चिम बंगालमध्ये सोसाट्याचा वारा आणि पाऊस अशी परिस्थिती असेल. छत्तीसगढ, सिक्कीम आणि आसाममधील काही भागांमध्येही पावसाच्या तुरळक सरी बरसतील. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी