Maharashtra Weather : पुढील 5 दिवस महत्त्वाचे; जाणून घ्या कुठे-कुठे बरसणार अवकाळी पाऊस

मुंबई
भरत जाधव
Updated Apr 10, 2023 | 11:04 IST

वातावरणातील वाऱ्याची खंडितता या प्रणालीमुळे सध्या राज्यात ठिकठिकाणी गारपिटीसह हलका ते मध्यम पाऊस होत आहे. रविवारी महाराष्ट्रातील बहुतांश भागाला गारपीट (hail) आणि जोरदार अवकाळी पावसाचा( unseasonal rain) तडाखा बसला आहे. यामुळे अनेक भागांमधील शेतपिकांचं (agricultural crops) नुकसानही झाले आहे. राज्यात अवकाळीने हाहाकार माजवलेला असतानाच आता हवामान खात्याकडून पुढील 5 दिवसांसाठी इशारा देण्यात आला आहे.

Weather Update: Meteorological department warning for next 5 days
Weather Update: पुढील 5 दिवसांसाठी हवामान खात्याचा इशारा   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • हवामान खात्याकडून पुढील 5 दिवसांसाठी इशारा देण्यात आला आहे.
  • मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता
  • कमाल तापमानात घट झाली असली तरी किमान तापमान आणि उकाड्यात वाढ झाली आहे.

Maharashtra Weather Update : वातावरणातील वाऱ्याची खंडितता या प्रणालीमुळे सध्या राज्यात ठिकठिकाणी गारपिटीसह हलका ते मध्यम पाऊस होत आहे. रविवारी महाराष्ट्रातील बहुतांश भागाला गारपीट (hail) आणि जोरदार अवकाळी पावसाचा( unseasonal rain) तडाखा बसला आहे. यामुळे अनेक भागांमधील शेतपिकांचं (agricultural crops) नुकसानही झाले आहे. राज्यात अवकाळीने हाहाकार माजवलेला असतानाच आता हवामान खात्याकडून पुढील 5 दिवसांसाठी इशारा देण्यात आला आहे. आज विदर्भात जोरदार वारे वाहून, मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा इशारा आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. ( The next 5 days are important; Know where unseasonal rain will fall)

अधिक वाचा  : महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त खास मराठी Messages

कमाल तापमानात घट झाली असली तरी किमान तापमान आणि उकाड्यात वाढ झाली आहे. आज विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  तसेच देशाच्या दक्षिणेकडे, म्हणजेच तेलंगणा, पुदुच्चेरी या भागामध्ये पुढील पाच दिवस हलक्या ते मध्यमत स्वरुपातील पावसाच्या सरी बरसतील. ओडिशा, झारखंड आणि हिमालयाच्या पट्ट्यामध्ये येणाऱ्या सिक्कीमलाही पावसाचा तडाखा बसेल.  

अधिक वाचा  :  अंबानीच्या पार्टीमध्ये या तारकांचे कपडे होते चमचम करणारे

आयएमडीच्या वृत्तानुसार पुढील 3 ते 5 दिवसांमध्ये हिमालयाचा पश्चिम भाग आणि त्यालगत येणारा भाग आणि पूर्वोत्तर भारत वगळता देशातील इतर राज्यांमध्ये कमाल तापमानात 3 ते 5 अंशांनी वाढ होणार आहे. तापमानवाढ होणार असली तरीही किमान पुढील पाच दिवस तरी देशात उष्णतेच्या लाटेची चिन्हे नाहीत असेही आयएमडीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. येत्या काळात देशामध्ये हवामान कोरडेच राहील. साधारणत: कोणत्याही पट्ट्यामध्ये चक्रीवादळसदृश परिस्थिती निर्माण होणार नाही, ज्यामुळं शेतकऱ्यांसाठी ही बाब दिलासादायक ठरेल.  

दरम्यान, या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्र्यांनी अवकाळी पावसाच्या मुदद्यावर  बैठक घेतली. लवकर पंचनामे करण्याचे करण्याच्या सूचना  सचिव आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी