Maharashtra Weather, Rain Update: २ आणि ३ जुलै रोजी मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई
सुनिल देसले
Updated Jul 01, 2020 | 15:13 IST

Maharashtra Weather, Rain Update: मुंबई आणि कोकणात येत्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच मुसळधार पाऊस पडेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

Rain
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

 • येत्या दोन दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज 
 • मुंबईसह संपूर्ण कोकणात पावसात वाढ होण्याची शक्यता 
 • हवामान खात्याने वर्तवला अंदाज 

Maharashtra Weather, Rain Update: महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले असले तरी अद्याप मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) आणि कोकणात (Konkan) हवा तसा पाऊस (Rain) झालेला नाहीये. मात्र, आता येत्या दोन दिवसांत मुंबई आणि संपूर्ण कोकणात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) पडणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.

या संदर्भात भारतीय हवामान खात्याच्या मुंबई (IMD Mumbai) केंद्राचे उपमहासंचालक के. एस. होसळीकर (K. S. Hosalikar) यांनी ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये के. एस. होसळीकर यांनी मुंबईसह कोकणात येत्या दोन दिवसात होणाऱ्या जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. २ आणि ३ जुलै रोजी मुंबईसह संपूर्ण कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे मुसळधार पाऊस पडेल. तसेच आज (१ जुलै) मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

पुढील हवामानाचा अंदाज

 1. १ जुलै - २ जुलै : कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रत बहुसांत ठिकाणी तर मराठवाड्यात, विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
 2. ३ जुलै - ४ जुलै: कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळदार पाऊस पडण्याची शक्यता. गोव्यासह संपूरण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.
 3. २ जुलै: कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र्रात व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.
 4. ३ जुलै - ४ जुलै: कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी हवामानाचा अंदाज 

 1. १ जुलै: मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता. 
 2. २ जुलै: मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता (घाट परीसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता)
 3. ३ जुलै: मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता (घाट परीसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता)
 4. ४ जुलै: मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता (घाट परीसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता)
 5. ५ जुलै: मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता (घाट परीसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता)
 6. ६ जुलै: मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता (घाट परीसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता)

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. शनिवारी परभणी शहराला जोरदार पावसाने झोडपले. शनिवारी झालेल्याम मुसळधार पावसामुळे शहरातील रत्यांवर पाणी साचल्याचं पहायला मिळालं. मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी