मुंबईसह महाराष्ट्रात थंडीचे आगमन, पुढील 10-12 दिवस थंडी जाणवणार

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 22, 2022 | 11:22 IST

Winter arrives in Maharashtra including Mumbai, Next 12 days will feel cold : मुंबईसह महाराष्ट्रात थंडीचे आगमन झाले आहे. मुंबईमध्ये रविवार 20 नोव्हेंबर 2022 रोजी 19.6 अंश से. किमान तापमानाची नोंद झाली.

Winter arrives in Maharashtra including Mumbai
मुंबईसह महाराष्ट्रात थंडीचे आगमन  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मुंबईसह महाराष्ट्रात थंडीचे आगमन
  • पुढील 10-12 दिवस थंडी जाणवणार
  • मुंबईमध्ये रविवार 20 नोव्हेंबर 2022 रोजी 19.6 अंश से. किमान तापमानाची नोंद

Winter arrives in Maharashtra including Mumbai, Next 12 days will feel cold : मुंबईसह महाराष्ट्रात थंडीचे आगमन झाले आहे. मुंबईमध्ये रविवार 20 नोव्हेंबर 2022 रोजी 19.6 अंश से. किमान तापमानाची नोंद झाली. महाराष्ट्रात पुढील 10-12 दिवस थंडी जाणवणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ईशान्येकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे थंडीचे आगमन झाले आहे. 

मुंबईत 22 ते 26 नोव्हेंबरच्या काळात थंडीची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. पण उर्वरित महाराष्ट्रात पुढील 10-12 दिवस थंडी जाणवणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विदर्भात काही ठिकाणी शीतलहर अर्थात तीव्र थंडीचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. 

Weight Loss Tips: जेवणानंतर 15 मिनिटं करा हे आसन, लोण्यासारखी वितळेल पोटाची चरबी

Excessive Thirst: वारंवार पाणी पिऊनही तुमची तहान भागत नसेल तर असू शकतात हे आजार...

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे किमान तापमान 10 ते 12 अंश से. तर राज्याच्या उर्वरित भागांमध्ये किमान तापमान 14 ते 16 अंश से. राहील असा प्राथमिक अंदाज आहे. थंडीची तीव्रता 27 नोव्हेंबर 2022 पासून महाराष्ट्रात जाणवू लागेल, असा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कोकण विभागात सोमवारी आणि मंगळवारी कमाल तापमान ३३ ते ३३.५ अंश से. राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. उर्वरित महाराष्ट्रात 28 ते 29 अंश से. कमाल तापमान असेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

थंडीत उबदार वाटावे यासाठी खा हे 4 पदार्थ

1. खजूर

खजुरांचा प्रभाव खूप उष्ण असतो. यासोबतच यामध्ये अनेक पोषक घटक असतात, जे तुमच्या शरीराला ऊब देण्यासोबतच हाडे मजबूत करण्यास आणि रक्ताची कमतरता पूर्ण करण्यास मदत करतात. याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते.

2. आले

आल्याचा वापर बहुतेक घरांमध्ये चहामधून हिवाळ्यात केला जातो. पण याचा वापर तुम्ही भाज्या, सॅलड, दूध यासारख्या गोष्टींमध्येही सहज करू शकता. आले अँटी-ऑक्सिडंट्स आणि अनेक प्रकारच्या पोषक तत्वांनी समृद्ध आहे, जे तुमच्या शरीराला फक्त उबदारपणाच देत नाही तर आणखी बरेच फायदे देण्यास मदत करते.

3. लसूण

लसणाचा प्रभाव अतिशय उष्ण असतो, त्यामुळे हिवाळ्यात शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी आहारात लसणाचा समावेश जरूर करावा. लसणाच्या पाकळ्या कापून त्यांचा आहारात समावेश केल्यास शरीर उबदार राहण्यास, रक्ताभिसरण सुधारण्यास आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल.

4. लाल मिरची

अख्खी लाल मिरची खूप उष्ण असते, त्यामुळे हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी अख्खी लाल मिरची खाणे फायद्याचे. लाल मिरचीत पोटॅशियम आणि मॅंगनीज सारखे पोषक घटक असतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.

थंडीत इम्युनिटी अर्थात रोगप्रतिकारकक्षमता वाढविण्यासाठी खा 2 पदार्थ

  1. गूळ : गुळामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न (लोह), व्हिटॅमिन्स (जीवनसत्वं), कॉपर हे पोषक घटक असतात. गुळ खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते. अॅनिमियाच्या रुग्णांनी दररोज मर्यादीत गुळ खाणे फायद्याचे. दमा, टीबी, शरीरात रक्ताची कमतरता असणे, रोगप्रतिकारक क्षमता कमी असणे यापैकी कोणत्याही समस्येने त्रस्त असल्यास दररोज मर्यादीत गुळ खा फायदा होईल.
  2. पेठा : पेठ्यात विविध खनिजे, व्हिटॅमिन्स, आयर्न, सल्फर, कॅल्शियम, फॉस्फरस, प्रोटिन हे पोषक घटक मर्यादीत प्रमाणात असतात. पेठा खाल्ल्याने पचनक्षमता सुधारण्यास मदत होते. बद्धकोष्ठतेचा त्रास बरा होण्यास मदत होते. पेठा रक्त शुद्ध करतो. मूत्रदोष, पोटातील जळजळ यावर पेठा उपयुक्त आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी