महाराष्ट्रात ५० लाखांपेक्षा जास्त नागरिकांना दिले लसचे दोन्ही डोस

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jun 10, 2021 | 18:28 IST

महाराष्ट्रात अडीच कोटींपेक्षा जास्त कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्यात आले. विशेष म्हणजे महाराष्ट्रात ५० लाखांपेक्षा जास्त नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसचे दोन्ही डोस देण्यात आले.

Maharashtra's cumulative vaccination coverage crosses 2.50 crore mark
महाराष्ट्रात अडीच कोटींपेक्षा जास्त कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचले 

थोडं पण कामाचं

  • महाराष्ट्रात अडीच कोटींपेक्षा जास्त कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचले
  • महाराष्ट्रात ५० लाखांपेक्षा जास्त नागरिकांना दिले लसचे दोन्ही डोस
  • भारतात ४ कोटी ६० लाख ८३ हजार ७३० जणांना दिले लसचे दोन्ही डोस

मुंबईः महाराष्ट्रात अडीच कोटींपेक्षा जास्त कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्यात आले. विशेष म्हणजे महाराष्ट्रात ५० लाखांपेक्षा जास्त नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसचे दोन्ही डोस देण्यात आले. जनगणनेच्या आकडेवारीनुसार २०१२ मध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या ११.४२ कोटी होती. या लोकसंख्येतील वाढ विचारात घेतली तरी राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी ५० लाखांपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले. Maharashtra's cumulative vaccination coverage crosses 2.50 crore mark

एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य असून त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश आणि गुजरातचा क्रमांक लागतो. राज्याच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचे कौतुक केले.

लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र सुरूवातीपासून देशात आघाडीवर असून त्यामध्ये सातत्य कायम राखले आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात २ कोटी ७ हजार ७० नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या सुमारे ५० लाख ८ हजार ४७६ एवढी आहे.

उत्तर प्रदेशात २ कोटी १५ लाख ६५ हजार नागरिकांना लस देण्यात आली असून गुजरातमध्ये १ कोटी ९१ लाख ८८ हजार नागरिकांचे तर राजस्थानमध्ये १ कोटी ८४ लाख ७६ हजार नागरिकांचे लसीकरण झाले.

भारतात आतापर्यंत २४ कोटी १६ लाख ३१ हजार ३०९ कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्यात आले. देशातील १९ कोटी ५५ लाख ४७ हजार ५७९ जणांना लसचा पहिला डोस देण्यात आला. तसेच ४ कोटी ६० लाख ८३ हजार ७३० जणांना लसचे दोन्ही डोस देण्यात आले. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत १०० पैकी ९१.१२ जणांचे तर भारतात १०० पैकी १७.१६ जणांचे लसीकरण झाले आहे. India's cumulative vaccination coverage crosses 24 crore mark

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी