कोरोनाच्या बाबतीत महाराष्ट्राचा विक्रम; जगातील अनेक देशांना टाकलं मागे, जाणून घ्या कोणता आहे रेकॉर्ड

मुंबई
भरत जाधव
Updated Jul 10, 2022 | 08:22 IST

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. गेल्या 24 तासात आलेल्या माहितीनुसार, 2760 जणांना कोरोनाची लागण झाली असून सध्या राज्यात 18 हजार 672 सक्रिय कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. याचदरम्यान महाराष्ट्राने कोरोनाच्या बाबतीत एक विक्रम केला आहे.  मार्च 2020 मध्ये राज्यात कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून, महाराष्ट्रात सर्वाधिक कोविड-19 च्या रुग्ण संख्या नोंदवण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत  एकूण संख्येने 8 दशलक्ष म्हणजेच 80 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. 

Maharashtra's record in the case of Corona
कोरोनाच्या बाबतीत महाराष्ट्राचा विक्रम  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई : महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. गेल्या 24 तासात आलेल्या माहितीनुसार, 2760 जणांना कोरोनाची लागण झाली असून सध्या राज्यात 18 हजार 672 सक्रिय कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. याचदरम्यान महाराष्ट्राने कोरोनाच्या बाबतीत एक विक्रम केला आहे.  मार्च 2020 मध्ये राज्यात कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून, महाराष्ट्रात सर्वाधिक कोविड-19 च्या रुग्ण संख्या नोंदवण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत  एकूण संख्येने 8 दशलक्ष म्हणजेच 80 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. 

जगात असे अनेक मोठे देश आहेत जिथे इतक्या प्रकरणांची नोंद झालेली नाही. नेदरलँड सारख्या देशात, महाराष्ट्र राज्यापेक्षा फक्त काही जास्त प्रकरणं आहेत, तर इराणमध्ये कमी प्रकरणे नोंदली गेली आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात 2,760 नवीन संसर्गाची नोंद झाली असून, 80,01,433 इतकीच प्रकरणे नोंदली गेली आहेत.
त्या तुलनेत, नेदरलँड्समध्ये आतापर्यंत 82,31,077 प्रकरणांची नोंद केली आहे. तर इराणमध्ये आतापर्यंत 72,46,707 प्रकरणं नोंदवली गेली आहेत, जे व्हॅल्डेरोमीटरवर अनुक्रमे 16 आणि 17 व्या क्रमांकावर आहेत.

Read Also : राष्ट्रपतींच्या स्विमिंग पूल आणि आलिशान बेडवर उड्या

महाराष्ट्रातील कोविड मृत्यूची संख्या 147,976 वर पोहोचली आहे, जी फ्रान्सच्या 150,017 च्या अगदी खाली आहे. तर युरोपीय राष्ट्र जगात 4 व्या क्रमांकावर आहे, वॅल्डेरोमीटरच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत एकूण 3,21,15,604 प्रकरणं आहेत.

Read Also : आयआयटीचे तंत्रज्ञान, शेणाद्वारे होणार पाण्याचे शुद्धीकरण

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात 78,34,785 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्रात सध्या 18,672 रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या 24 तासांत मुंबईतून कोविड-19 चे 499 रुग्ण आढळले आहेत. नाशिक विभागात 162 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर पाच जणांचा मृत्यू झाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी