Maharasthra HSC Result 2022 Date soon on mahresult nic in check here expected result date and how to check : मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात महाराष्ट्र राज्याच्या बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची तयारी सुरू आहे. निकाल ५ जून ते १० जून २०२२ या कालावधीत कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. लवकरच निकालाची अधिकृत तारीख बोर्डाकडून जाहीर केली जाईल.
निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे वैयक्तिक गुणपत्रक ऑनलाइन बघण्याची सोय https://msbshse.co.in/ या वेबसाइटवर बघण्याची सोय उपलब्ध होईल. यासाठी ज्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीचा निकाल बघायचा आहे त्याचा सीट नंबर तसेच संबंधित व्यक्तीच्या आईचे नाव नमूद करावे लागेल. यानंतर व्ह्यू रिझल्ट या बटणावर क्लिक करताच वैयक्तिक गुणपत्रक बघता येईल.
एखाद्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला निकालाविषयी आक्षेप असतील किंवा विशिष्ट विषयात देण्यात आलेल्या गुणांविषयी आक्षेप असतील तर तक्रार करता येईल. या संदर्भातील प्रक्रिया बोर्डाकडून निकालाची तारीख जाहीर केली जाईल त्याच दिवशी सांगितली जाईल.
बारावीची महाराष्ट्र बोर्डाची परीक्षा ४ मार्च ते ३० एप्रिल २०२२ या कालावधीत पार पडली. पेपर तपासणीचे काम वेगाने सुरू आहे. अनेक पेपर तपासून पुन्हा बोर्डाकडे जमा झाले आहेत. तपासणीची प्रक्रिया शनिवार २८ मे २०२२ रोजी संपणार आहे. यानंतर निकाल जाहीर करण्यासाठी पुढील टप्प्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
यंदा महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेला १४.७२ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी बसले होते. शिक्षकांचा संप, औरंगाबादमध्ये पेपर तपासणी प्रक्रियेचा मंदावलेला वेग यामुळे निकाल लागण्यास दिरंगाई होईल अशी शक्यता वाटत होतील. पण वाया गेलेला वेळ भरून काढत शिक्षकांनी निकालाशी संबंधित कामकाज वेगाने पूर्ण करायला सुरुवात केली आहे. उत्तम नियोजन करून निकालाचे काम अंतिम टप्प्यापर्यंत आणण्यात आले आहे. यामुळेच निकाल ५ ते १० जून २०२२ दरम्यान कधीही लागेल असे संकेत मिळत आहेत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.