महाविकास आघाडी सरकारच्या पोलीस बढती बदली आदेशाला २४ तासांत स्थगिती

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Apr 21, 2022 | 10:59 IST

Mahavikas Aghadi government police promotion transfer order on hold within 24 hours : महाराष्ट्रातील विशेष पोलीस महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक आणि अधीक्षक दर्जाच्या ३७ अधिकाऱ्यांच्या बढती आणि बदलीचे आदेश बुधवार २० एप्रिल २०२२ रोजी काढण्यात आले होते. या आदेशांना २४ तासांच्या आत स्थगिती देण्यात आल्याचे वृत्त

Mahavikas Aghadi government police promotion transfer order on hold within 24 hours
महाविकास आघाडी सरकारच्या पोलीस बढती बदली आदेशाला २४ तासांत स्थगिती  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • महाविकास आघाडी सरकारच्या पोलीस बढती बदली आदेशाला २४ तासांत स्थगिती
  • महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांमध्ये काही मुद्यांवर मतभेद झाल्यामुळे आदेशाला स्थगिती दिल्याची चर्चा
  • आदेश स्थगित होण्यामागे काही राजकारण दडलं आहे की अर्थकारण अशीही चर्चा जोरात

Mahavikas Aghadi government police promotion transfer order on hold within 24 hours : मुंबई : महाराष्ट्रातील विशेष पोलीस महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक आणि अधीक्षक दर्जाच्या ३७ अधिकाऱ्यांच्या बढती आणि बदलीचे आदेश बुधवार २० एप्रिल २०२२ रोजी काढण्यात आले होते. या आदेशांना २४ तासांच्या आत स्थगिती देण्यात आल्याचे वृत्त टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीने दिले आहे.

महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांमध्ये काही मुद्यांवर मतभेद झाल्यामुळे पोलिसांच्या बढती बदलीचे आदेश स्थगित करण्यात आले अशी चर्चा आहे. राज्याच्या गृहमंत्रालयाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने अद्याप या विषयावर प्रतिक्रिया दिलेली नाही. आदेश स्थगित केला आहे की नाही या मुद्यावर अधिकारी सूचक मौन बाळगत असल्याचे चित्र आहे. 

याआधी अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री असताना पोलिसांच्या बढती बदलीच्या आदेशांवरून मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या आल्या होत्या. आता दिलीप वळसे पाटील गृहमंत्री असताना पुन्हा एकदा पोलिसांच्या बढती बदलीच्या आदेशांवरून मतभेद असल्याची चर्चा आहे. आदेश स्थगित होण्यामागे काही राजकारण दडलं आहे की अर्थकारण अशीही चर्चा जोरात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी