MVA Leaders : मुंबई : आज महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधीमंडळाच्या पायर्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. तसेच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणीही केली. जेव्हा शिंदे गटातील आमदार विधीमंडळात आले तेव्हा आदित्य ठाकरे यांच्यासह सर्व नेत्यांनी आले रे आले गद्दार आले अशा घोषणा दिल्या. (mahavikas aghadi leader ghoshnabaji agiast bjp and eknath shinde in maharashtra assembly)
कालपासून महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. कालही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांविरोधात घोषणाबाजी केली. आले रे आले गद्दार आले, ५० खोके ५० खोते, खाऊन खाऊन माजलेत बोके, आले रे आले गद्दार आले. फिफ्टी फिफ्टी गुवाहाटी, ईडी जिसकी मम्मी है, सरकार उसकी निकम्मी है, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. तसेच फिफ्टी फिफ्टीच्या घोषणा देताना फिफ्टी फिफ्टी बिस्किटचे पुडेही आणले होते.
सोडून गेलेले आमदार हे आमच्या कुटुंबाचा भाग होते ते आम्हाला सोडून गेले तर ते गद्दारच आहेत. या आमदारांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांना गद्दार नाहीतर आणखी काय म्हणायचे असेही आदित्य ठाकरे म्हणाले. शिवसेना नेते काल विधीमंडळाच्या पायर्यांवर घोषणा देताना शंभूराजे देसाई यांनी ५० खोके पाहिजे का असे मिष्किलपणे विचारले त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, ५० खोक्यांमध्ये आहे काय यासाठी आम्ही फिफ्टी फिफ्टीचा बिस्किटचा पुडा आणला आहे. एखादा मंत्री दुसर्यांना अशी ऑफर कशी देऊ शकतो याचा विचार जनतेने करणे गरजेचे आहे असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.