राहुल गांधींमुळे महाविकास आघाडीत बिघाडी! शिवसेना परत भाजपकडे मैत्रीची साद घालणार का?

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 18, 2022 | 13:30 IST

.युती तुटल्यापासून भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेला आपल्या जवळ करण्याचा प्रयत्न करतेय. तसेच काही घडामोडींवरुन भाजपकडे शिवसेना जाणार असल्याची शंका येत आहे. राहुल गांधींनी सावकरांचं पत्र दाखवत त्यांच्याविरोधात वक्तव्य केलं होतं. त्यावरुन भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली. त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींच्या विधानापासून दूर राहणं पसंत केलं. त्यात आज संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षाला आघाडी तुटण्याचा इशारा दिला आहे.

Will Shiv Sena show friendship to BJP again?
शिवसेना परत भाजपकडे मैत्रीची साद घालणार का?   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सावरकरांविषयी केलेलं चुकीचं वक्तव्य शिवसेनेला मान्य नाही.
  • महाविकास आघाडीतही फूट पडू शकते- संजय राऊत
  • महाविकास आघाडी बनत असताना शिवसेना आणि काँग्रेसच्या विचारांचा आदार केला गेला पाहिजे असा ठराव सहमत झाला होता.

मुंबई :  वीर सावकर यांच्यावर राज्यासह देशातील राजकारण तापलं आहे. सावरकर यांच्याविषयी वक्तव्य करून राहुल गांधींनी (Rahul Gandhi) महाराष्ट्रात काँग्रेसला मिळालेला नवीन मित्र दुरावण्याची शक्यता आहे. राहुल गांधींच्या सावरकरांविषयी केलेलं वक्तव्य राज्यातील महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) बिघाडीचं कारण ठर शकतं.  काल पत्रकारांशी बोलताना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (Shiv Sena) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) राहुल गांधींच्या वक्तव्यापासून दोन हात लांब राहत आपण त्याशी सहमत नसल्याचं म्हटलं. तर आज ठाकरे गटातील प्रमुख नेते खासदार (Shiv Sena MP) संजय राऊत ( Sanjay Raut)यांनी काँग्रेसला आघाडी तोडण्याचा थेट इशारा दिला आहे.  (Mahavikas Aghadi will broke due to Rahul Gandhi? Will Shiv Sena  friendship with BJP again?) 

अधिक वाचा  : राज्य मंत्रिमंडळात 15 महत्त्वाचे निर्णय, वाचा सविस्तर....

वीर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याशी शिवसेना सहमत नाही हे आम्ही स्पष्ट केल्याचे शिवसेना खासदार  संजय राऊत म्हणाले. सावरकरांविषयी केलेलं चुकीचं वक्तव्य शिवसेनेला मान्य नाही, शिवसेना ते सहन करणार नाही. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळाला. मात्र, या यात्रेत वीर सावरकर यांचा विषय काढण्याची काही गरज नव्हती, असेही राऊत पत्रकारांशी बोलताना  म्हणाले. हा विषय काढल्यामुळे फक्त शिवसेनेलाच धक्का बसला असं नाही तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना देखील धक्का बसला असल्याचे राऊत म्हणाले. यामुळं महाविकास आघाडीतही फूट पडू शकते, हे मी तुम्हाला सांगतो, असा इशारा देताना सावरकर हे आमचं श्रद्धाचं स्थान असल्याचं राऊत म्हणालेत. 

अधिक वाचा  : लग्न पत्रिकेचा मायना, चारोळी अन् आमंत्रण पत्रिका मराठीत

खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला. याआधी काँग्रेसचं गुणगान गाणारे संजय राऊत यांनी थेट राहुल गांधींना इशारा दिला आहे.  दरम्यान पत्रकारांशी बोलतना राऊत पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांनी सावरकरांवर टीका केल्याने राज्यातील काँग्रेस नेत्यांची अवस्था बिकट झाली आहे. महाराष्ट्र आणि देशातील लोकांना सावरकरांबद्दल आदर. इतिहासात काय घडलं आणि काय नाही हे चिवडत बसण्यापेक्षा नवा इतिहास निर्माण करावा. त्या मताचे आम्ही आहोत. राहुल गांधींनी त्याकडे लक्ष द्यावं, असा कानमंत्र देखील राऊत यांनी दिला आहे. इतकं सर्व झाल्यानंतर साहजिकच सामान्य नेत्यांच्या आणि नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, काय खरचं शिवसेना पुन्हा भाजपशी युती करणार का? 

शिवसेना परत भाजपला मैत्रीची साद घालणार का? 

भाजप नेते वारंवार हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करत असते. जेणेकरुन शिवसेना म्हणजे ठाकरे गट आघाडीच्या विरोधात काही विधान करेल आणि त्याचा फायदा भाजपला होईल.युती तुटल्यापासून भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेला आपल्या जवळ करण्याचा प्रयत्न करतेय. तसेच काही घडामोडींवरुन भाजपकडे शिवसेना जाणार असल्याची शंका येत आहे. राहुल गांधींनी सावकरांचं पत्र दाखवत त्यांच्याविरोधात वक्तव्य केलं होतं. त्यावरुन भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली. त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींच्या विधानापासून दूर राहणं पसंत केलं. त्यात आज संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षाला आघाडी तुटण्याचा इशारा दिला आहे.

अधिक वाचा  :  भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट सामना लाइव्ह स्ट्रिमिंग

दरम्यान, महाविकास आघाडी बनत असताना शिवसेना आणि काँग्रेसच्या विचारांचा आदार केला गेला पाहिजे असा ठराव सहमत करण्यात आला होता. हा ठराव उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यात बैठक झाली होती. त्यावेळी आत्ताचे काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हेही उपस्थित होते. तसेच प्रियंका गांधी आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी संजय राऊतही सहभागी होते.

भाजपशी दोन हात करण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याची म्हणत काँग्रेस आणि शिवसेनेत हा ठराव सहमत झाला होता. भाजपशी दोन हात करण्यासाठी विरोधी पक्ष मजबूत झाला पाहिजे. समान युती राजकीय आणि प्रशासकीय प्राधान्यक्रम मजबूत करण्यासाठी आणि प्रतिस्पर्ध्यांविरूद्ध दृढपणे एकत्र येण्यासाठी राजकीय त्रुटी दूर करणे चांगले होईल, यावर ठाकरे यांनी या मुद्द्यावर भर दिला होता.  त्यावेळी एकमेंकांच्या विचारांचा आदर करण्याचा ठराव करण्यात आला होता. 

अधिक वाचा  :  'तर आता सरकारच्या दारातच आमचे मुडदे पडतील

परंतु राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावर टीका केल्याने महाविकास आघाडीमधील ठरावावर कुऱ्हाड चालवली आहे.  दरम्यान सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत राहुल गांधी उपस्थित नव्हते. या बैठकीची माहिती असलेल्या  शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितले की, राहुल यांची इतर ठिकाणी पूर्वनियोजित कामे असल्याने ते बैठकीला उपस्थित नव्हते. त्यांच्या आईने शिवसेनेच्या नेत्यांना सावरकरांबद्दलचा मुद्दा राहुल यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले होते. गुरुवारी सावरकरांवर भाष्य करेपर्यंत राहुल यांनी नेहमीची टीका टाळल्याचे शिवसेनेच्या नेत्यांचे निरीक्षण आहे. परंतु आता राहुल गांधींनी सावरकरांवर टीका केल्यानं  महाविकास आघाडी तुटणार का असा प्रश्न पडत आहे. आघाडी तुटली तर भाजपशी शिवसेना पुन्हा मैत्री करणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

तुरुंगातून आल्यानंतर संजय राऊत यांचे सूर बदलले 

पत्रा चाळप्रकरणी जवळपास शंभर दिवस तुरुंगात राहिल्यानंतर संजय राऊत यांचे भाजपविषयी थोडे सूर बदलेले आहेत. जामीन मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी माध्यमांशी बोलताना राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कामांचे कौतुक केलं होतं. तसेच आपण त्यांना भेटणार असल्याचंही ते म्हणाले होते. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील राजकारणात असलेल्या कडूपणा मिटावा, असं म्हटलं त्याचं मी स्वागत करतोय, असं राऊत म्हणाले होते.  

राहुल गांधींच्या विधानावर उद्धव ठाकरे नाराज 

बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराशी गद्दारी होत नसल्याचे अधोरेखित करत ठाकरे म्हणाले की, शिवसेनेला (ते ज्या गटाचे नेतृत्व करतात) वि.दा.सावरकरांबद्दल नितांत आदर आहे. तसेच  "राहुल गांधीजींनी जे सांगितले ते आम्ही मान्य करत नाही... आम्ही वीर सावरकरांचा आदर करतो.  सावरकरांची बदनामी, त्यांच्याविषयीचं चुकीचं वक्तव्य शिवसेनेला मान्य नाही. शिवसेना सहन करणार नाही. हे सांगितल्यावर आमचा विषय संपतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.  उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या या भूमिकेवर भाजप खूप खूश झाली आहे. त्यात संजय राऊत यांची मवाळ भूमिका हे सर्व प्रकरण राज्यातील राजकरणात नवीन वळण येण्याचे संकेत दिसत आहेत. 

हिंदुत्वाशी संबंधित भूमिका घेतल्या तर नक्कीच आनंद होईल

राहुल गांधींनी सावरकरांबाबत जे वक्तव्य केलं आहे. त्याच्याशी शिवसेनेने, उद्धवजींनी असहमती व्यक्त करणे, सावरकरांबाबत श्रद्धा व्यक्त करणे याचं मी स्वागत करतो. याच स्पीडने जर त्यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाशी संबंधित सर्व भूमिका घेतल्या तर या राज्यातील सर्वसामान्यांना नक्कीच आनंद होईल,  असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी