Mahim Dargah construction demolition: मुंबईतील माहीम येथील समुद्रात अनधिकृत मजार बांधण्यात आल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं. इतकेच नाही तर त्या संदर्भातील ड्रोनने टिपलेली दृश्यही गुढीपाडवा मेळाव्यात दाखवली. हे अनधिकृत बांधकाम तोडा अन्यथा आम्ही तेथे गणपतीचं मंदिर उभारू असा अल्टिमेटमच यावेळी राज ठाकरेंनी दिला होता. या अल्टिमेटमनंतर मुंबई मनपाने अवघ्या 12 तासांत कारवाई केली आहे.
हे पण वाचा : उन्हाळ्यात माठातले पाणी पिण्याचे अद्भूत फायदे
मुंबई महानगरपालिकेने मुंबई पोलिसांच्या मदतीने या परिसरात बंदोबस्त तैनात केला आणि त्यानंतर सकाळच्या सुमारास माहीम समुद्रातील अनधिकृत मजारीवर कारवाई केली आहे. महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्डाचे अधिकारी हे माहीम समुद्रातील त्या अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणी दाखल झाले आणि त्यानंतर तेथील मजारीचं मॅपिंग करण्यायात आलं. त्यानंतर मुंबई मनपाचे अतिक्रमण विरोधी पथक जेसीबीसह दाखल झालं आणि या बांधकामावर कारवाई करण्यात आली.
हे पण वाचा : हे शाकाहारी पदार्थ तुमचे मसल्स बनवतील बळकट
Now there is a government that walks on the path of Balasaheb Thackeray. Raj Thackeray raised the issue which was earlier raised by Balasaheb Thackeray. Proceedings have been initiated under the Coastal Regulation Zone (CRZ) and if any kind of construction has to be done in the… pic.twitter.com/MDSdJxMtSe — ANI (@ANI) March 23, 2023
गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी माहीम समुद्रातील अनधिकृत बांधकामाच्या संदर्भातील मुद्दा उपस्थित केला. राज ठाकरेंनी म्हटलं, माहीमच्या मगदूम बाबा दर्ग्याच्या इकडे समुद्रात अनधिकृत बांधकाम केलंय. दोन वर्षांपूर्वी हे काहीच नव्हतं. इथे नवीन हाजीअली तयार करणं सुरु आहे. दिवसाढवळ्या हे सुरू आहे, आणि तरीही पोलीस, महापालिका यांना दिसलं नाही?
हे पण वाचा : दूध प्यायल्याने कॅन्सर होऊ शकतो?
संपूर्ण व्हिडीओ : सन्मा. राजसाहेबांनी आज एक अत्यंत महत्त्वाची बाब समोर आणली... सरकारचं/प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्यावर काय होतं ते पहा… माहीमच्या मगदूम बाबा दर्ग्याच्या इकडे समुद्रात हे अनधिकृत बांधकाम केलं. २ वर्षांपूर्वी हे काहीच नव्हतं. इथे नवीन हाजीअली तयार करणं सुरु आहे.… pic.twitter.com/BQ2CH1NmCb — MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 22, 2023
सरकारचं / प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्यावर काय होतं ते पहा… माहीमच्या मगदूम बाबा दर्ग्याच्या इकडे समुद्रात हे अनधिकृत बांधकाम केलं. 2 वर्षांपूर्वी हे काहीच नव्हतं. इथे नवीन हाजीअली तयार करणं सुरु आहे. दिवसाढवळ्या हे सुरु आहे, आणि तरीही पोलीस, महापालिका ह्यांना दिसलं नाही? तात्काळ कारवाई करा, हे अनधिकृत बांधकाम तोडा. अन्यथा तिथे आम्ही मोठं गणपतीचं मंदिर उभं करू. आता जे होईल ते होईल असंही राज ठाकरे म्हणाले होते.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.