आयुर्वेदिक औषधांच्या नावाखाली  तब्बल १,००० कोटींच्या हेरोईनची स्मग्लिंग, मुंबईत मोठा साठा जप्त 

Major drug haul in Mumbai । मुंबई :  मुंबईजवळच्या नाव्हा-शेवा बंदरावर सुमारे १ हजार कोटी रुपयांची हेरोईन गेल्या शनिवारी जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

Major drug haul in Mumbai
१,००० कोटींच्या हेरोईनची स्मग्लिंग, मुंबईत मोठा साठा जप्त   |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • मुंबईजवळच्या नाव्हा-शेवा बंदरावर सुमारे १ हजार कोटी रुपयांची हेरोईन गेल्या शनिवारी जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
  • सुमारे १९१ किलो वजनाची हेरोईन अधिकाऱ्यांनी मिळालेल्या टीपच्या आधारावर जप्त केली.
  • अधिकाऱ्यांनी जेव्हा संशयित कन्टेनरची तपासणी केली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की ड्रग्जही नारंगी रंगाच्या गोण्यांमध्ये होते.

मुंबई :  मुंबईजवळच्या नाव्हा-शेवा बंदरावर सुमारे १ हजार कोटी रुपयांची हेरोईन गेल्या शनिवारी जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सुमारे १९१ किलो वजनाची हेरोईन अधिकाऱ्यांनी मिळालेल्या टीपच्या आधारावर जप्त केली. ही कोट्यवधी रुपयांची हेरोईन अफगाणिस्तानातून इराणमार्गे भारतात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

ही सर्व ड्रग्ज छोट्या छोट्या प्लास्टिकच्या पाइपमध्ये लपविण्यात आली होती. तसेच त्या पाईपला असे रंगविण्यात आले होते की ते बांबू दिसतील. हा ड्रग्जची वाहतूक सहजासही व्हावी म्हणून हा सर्व साठा आयुर्वेदिक औषध म्हणून पाठविण्यात आला होता. 

 कस्टमच्या अधिकाऱ्यांनी टीप दिल्यानंतर  कस्टम आणि महसूल गुप्तहेर संचलनालय(Directorate of Revenue Intelligence)अधिकाऱ्यांनी एकत्रित कारवाई करून हा ड्रग्जचा साठा जप्त केला.  यानंतर विशेष गुप्तचर खात्याचे अधिकारी आणि इनव्हेस्टिंगेशन ब्रान्चचे अधिकारी महसूल गुप्तचर संचलनालयाच्या मदतीला आले.  

गोण्यामध्ये होती १९१ किलो ड्रग्ज 

अधिकाऱ्यांनी जेव्हा संशयित कन्टेनरची तपासणी केली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की ड्रग्जही नारंगी रंगाच्या गोण्यांमध्ये होते. ते सरर्विम एक्सपोर्टने आयात केल्या होते. या गोण्यांमध्ये जेष्ठमधाच्या काड्या होत्या.  या जेष्ठमधाच्या काड्यासोबत हे पाईप होते. त्यात ही हेरॉइन ठेवण्यात आली होती.  अधिकाऱ्यांच्या लक्षात आले की हे हिरवे पाईप वेगळ्या पद्धतीचे आहे. त्यामुळे त्यांना संशय आला. त्यांनी हे पाइप उघडून पाहिले तर त्यात पावडर सारखे काही तरी आठळले. त्यानंतर NDPS कडून  टेस्ट करण्यात आली, त्यात ही हेरॉइन असल्याचे स्पष्ट झाले. 

टेस्ट झाल्यानंतर सर्व ड्रग्जचा साठा एनडीपीएसने जप्त केला.  या प्रकरणी दोन कस्टम एजंटला अटक करण्यात आली आहे. यात एमबी शिपिंग अँड लॉजेस्टिक सोल्यूशनचा मीनानाथ बोडके आणि कोडींभाऊ पांडुरंग गुंजन यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात हात असल्यामुळे त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी