Tipu Sultan Controversy : भाजपच्याच काही नेत्यांनी रस्त्याला टिपू सुलतानचे नाव दिले, फडणवीस त्यांचे राजीनामे घेणार का? पालकमंत्री अस्लम शेख यांचा सवाल

मालाडमध्ये एका क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यात आले आहे. या निर्णयाला भाजपसह बजरंग दलाने विरोध केला आहे. परंतु इथल्या एका मार्गाला भाजपच्या नेत्यांनी टिपू सुलतानचे नाव दिले आहे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे या नेत्यांचे आणि नगरसेवाकांचे राजीनामे घेणार का असा सवाल मालाडचे आमदार आणि मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी उपस्थित केला आहे.

aslam sheikh
अस्लम शेख  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • मालाडमध्ये एका क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यात आले आहे.
  • या निर्णयाला भाजपसह बजरंग दलाने विरोध केला आहे.
  • परंतु इथल्या एका मार्गाला भाजपच्या नेत्यांनी टिपू सुलतानचे नाव दिले आहे

Tipu Sultan Controversy : मुंबई : मालाडमध्ये एका क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यात आले आहे. या निर्णयाला भाजपसह बजरंग दलाने विरोध केला आहे. परंतु इथल्या एका मार्गाला भाजपच्या नेत्यांनी टिपू सुलतानचे नाव दिले आहे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे या नेत्यांचे आणि नगरसेवाकांचे राजीनामे घेणार का असा सवाल मालाडचे आमदार आणि मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी उपस्थित केला आहे. भाजप नामांतरावरून केवळ राजकारण करत आहे अशी टीकाही शेख यांनी केली आहे. 

मालाडमध्ये नुकतंच एक क्रीडा संकुल नागरिकांसाठी सुरू झाले आहे. या संकुलाचे नाव टिपू सुलतान ठेवण्यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. यावरून भाजप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली होती. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. यावर आमदार अस्लम शेख म्हणाले की, ही जागा अतिशच गलिच्छ झाली होती. इथे कचरा होता, बेकायदेशीर झोपड्या होत्या, हे सारे बाजूला करून इथे आम्ही उत्तम क्रीडा संकूल उभे केले आहे. भाजपने नावा ऐवजी कामावर प्रश्न विचारावे. नावांवरून भाजपला राजकारण करण्याची सवय आहे असे शेख म्हणाले. तसेच भाजपच्या नेत्यांनी आणि नगरसेवकांनी इथल्या रस्त्याला टिपू सुलतानचे नाव दिले होते. या नगरसेवकांचे देवेंद्र फडणवीस राजीनामा घेणार का? आता मुंबईत निवडणूक येऊ घातली आहे म्हणून भाजप हे सगळे राजकारण करत असल्याची टीकाही शेख यांनी केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी