पवारांच्या भेटीसाठी ममता बॅनर्जी  'सिल्व्हर ओक' वर दाखल 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) दोन दिवसीय महाराष्ट्र (Maharashtra Tour) दौऱ्यावर आहे.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar)यांची भेट घेण्यासाठी ममता बॅनर्जी सिल्व्हर ओक (Silver oak)येथे दाखल झाल्या आहेत.

पवारांच्या भेटीसाठी ममता बॅनर्जी  'सिल्व्हर ओक' वर दाखल 
पवारांच्या भेटीसाठी ममता बॅनर्जी  'सिल्व्हर ओक' वर दाखल   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) दोन दिवसीय महाराष्ट्र (Maharashtra Tour) दौऱ्यावर आहे.
  •  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar)यांची भेट घेण्यासाठी ममता बॅनर्जी सिल्व्हर ओक (Silver oak)येथे दाखल झाल्या आहेत.
  • या बैठकीसाठी सिल्व्हर ओक येथे अनेक राष्ट्रवादीचे नेतेदेखील उपस्थित आहेत.  

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) दोन दिवसीय महाराष्ट्र (Maharashtra Tour) दौऱ्यावर आहे.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar)यांची भेट घेण्यासाठी ममता बॅनर्जी सिल्व्हर ओक (Silver oak)येथे दाखल झाल्या आहेत. थोड्याच वेळात पवारांच्या घरी या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीसाठी सिल्व्हर ओक येथे अनेक राष्ट्रवादीचे नेतेदेखील उपस्थित आहेत.  यामध्ये धनंजय मुंडे, बाळासाहेब पाटील, हसन मुश्रीफ, रामराजे नाईक आदी नेते मंडळी दाखल झाले आहेत.

ममता बॅनर्जी यांनी कालच आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट घेतली. दरम्यान, शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्यात बैठकीला सुरुवात झाली आहे.  यामध्ये नेमक्या कोणकोणत्या विषयांवर चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिल आहे.

ममतांचा मराठीतून संवाद

शरद पवार यांच्या भेटीपूर्वी ममता बॅनर्जी यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात पत्रकारांशी संवाद साधला. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी उपस्थितांशी मराठीतून संवाद साधला. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, महाराष्ट्रातील सर्व जनतेला माझे अभिवादन आणि हार्दिक शुभेच्छा!" त्यांच्या या संवादानंतर सभागृहातील उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडात केला. यावेळी सभागृहात जावेद अख्तर आणि स्वरा भास्कर उपस्थित होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी