Selfie Accident : सेल्फी घेण्यासाठी चढला ट्रेनवर, तरुणाला लागला हजारो वोल्टचा शॉक, प्रकृती गंभीर 

Selfie Accident : मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सेल्फी घेण्यासाठी एक तरुण चक्क ट्रेनवर चढला होता, परंतु ट्रेनवरील ओव्हरहेड वायरचा हजारो वोल्टचा त्याला शॉक बसला आणि तो खाली कोसळला. यात हा तरुण ८० टक्के भाजला असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे.

shock
सेल्फी घेण्याच्या नादात लागला हजारो वोल्टचा शॉक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सेल्फी घेण्यासाठी एक तरुण चक्क ट्रेनवर चढला होता,
  • परंतु ट्रेनवरील ओव्हरहेड वायरचा हजारो वोल्टचा त्याला शॉक बसला आणि तो खाली कोसळला.
  • यात हा तरुण ८० टक्के भाजला असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे.

Selfie Accident : मुंबई : मुंबईत (Mumbai) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सेल्फी (Selfie) घेण्यासाठी एक तरुण चक्क ट्रेनवर (Climbed on train) चढला होता, परंतु ट्रेनवरील ओव्हरहेड वायरचा (overhead wire) हजारो वोल्टचा त्याला शॉक (thousand volt shock) बसला आणि तो खाली कोसळला. यात हा तरुण ८० टक्के भाजला (80 percent burned) असून त्याची प्रकृती गंभीर (condition critical) असल्याचे समोर आले आहे. (man climbed train for taking selfie and injured by overhead wire shock mumbai read in marathi)

अधिक वाचा : एकनाथ शिंदे गेलेल्या रस्त्यावर शिवसैनिकांनी शिंपडले गोमुत्र, पहा व्हिडीओ

अमन शेख असे या तरुणाचे नाव आहे. सकाळी ९.५५ वाजता ही घटना घडली. अरवली एक्सप्रेस ही गाडी जोगेश्वरी यार्डात उभी होती, ही गाडी दुपारी  बांद्रा टर्मिनसहून निघणार होती. बोरिवली रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमन शेख हा २० वर्षीय तरुण जोगेश्वरी पूर्व भगात सामान रेल्वेत चढवण्याचे आणि उतरवण्याचे काम करत असे. हे पार्सल नंतर फ्लिपकार्ट आणि ऍमेझॉनचे कर्मचारी हे पार्सल डिलिव्हरीसाठी नेऊन जातात. सोमवारी अमन शेख याची सकाळी  ५.३० वाजता ड्युटी होती. त्याला काही काम नसल्याने तो साडे नऊच्या सुमारास ऑफिसमधून निघाला. यावेळी अनिल कदम ऑन ड्युटी होते तेव्हा जोगेश्वरी यार्डातून एक जोरात आवाज आला. त्यानंतर उपस्थित लोकांनी तिथे धाव घेतली. तेव्हा अमन शेख ट्रेनवरून खाली कोसळला होता. त्याच्या हातात मोबाईल होता. या घटने अमन शेख हा गंभीर जखमी झाला होता. त्याला तत्काळ केईम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमन शेख या घटनेत ८० टक्के गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. 

अधिक वाचा : Ahmednagar Rain: संगमनेरमध्ये पावसाचा हाहाकार, अनेक गावांचा संपर्क तुटला

कदम यांनी दिलेल्या माहितीनुसारराम मंदिर आणि जोगेश्वरी स्थानकादरम्यान अमन शेख या गाडीवर चढला होता. अमन हा नेमका कशासाठी ट्रेनवर गेला होता याची प्राथमिक माहिती नसली तरी जेव्हा तो जखमी होऊन खाली पडला तेव्हा त्याच्या हातात फोन होता आणि तो सेल्फी घेत होता अशी माहिती कदम यांनी दिली आहे.  अमन शेख हा या यार्डात नेहमी जातो की पहिल्यांदाच गेला होता याची चौकशी पोलीस करत आहे. या यार्डात कुठलेही सीसीटीव्ही नाही, त्यामुळे शेख इथे कसा पोहोचला याचाही पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी अमन शेख याच्या सहकार्‍यांची आणि मित्रांची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 

अधिक वाचा : Eknath shinde 'सभेसाठी पैसे देवून गर्दी जमवली जातेय' ठाकरे गटाने केलेल्या आरोपावर स्वतः एकनाथ शिंदे यांनी दिली पहिली प्रतिक्रिया

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी