Weather Report For Maharashtra : मार्चपासून मे महिन्यापर्यंत उष्णतेच्या अनेक लाटा येणार, महाराष्ट्रासाठी असा आहे हवामानाचा अंदाज

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Mar 01, 2023 | 08:17 IST

many heat waves from March 2023 to May 2023, this is the weather forecast for Maharashtra : मार्च 2023 ते मे 2023 या काळात उष्णतेच्या अनेक लाटा येणार आहेत. हा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Weather Report For Maharashtra
मार्चपासून मे महिन्यापर्यंत उष्णतेच्या अनेक लाटा येणार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मार्चपासून मे महिन्यापर्यंत उष्णतेच्या अनेक लाटा येणार
  • वायव्य भारताचा काही भाग, मध्य भारत, पूर्व आणि ईशान्य भारताचा बहुतांश भाग येथे सरासरीपेक्षा कमाल तापमान अधिक असेल
  • देशाच्या उर्वरित भागात सरासरी किंवा त्याहून कमी कमाल तापमानाची शक्यता

many heat waves from March 2023 to May 2023, this is the weather forecast for Maharashtra : मार्च 2023 ते मे 2023 या काळात उष्णतेच्या अनेक लाटा येणार आहेत. वायव्य भारताचा काही भाग, मध्य भारत, पूर्व आणि ईशान्य भारताचा बहुतांश भाग येथे सरासरीपेक्षा कमाल तापमान अधिक असेल. देशाच्या उर्वरित भागात सरासरी किंवा त्याहून कमी कमाल तापमानाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

उत्तर कोकणामध्ये मार्च 2023 ते मे 2023 या काळात कमाल तापमान आणि किमान तापमान वाढणार आहे. दक्षिणेकडे काही भागात किमान तापमान सरासरी किंवा त्याहून कमी असू शकते. मात्र इतर भागात सरासरीहून अधिक किमान तापमान असेल असा अंदाज आहे. किमान तापमान पूर्ण कोकण भागात वाढेल असाही अंदाज आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी किमान तापमान सरासरीइतके असेल. मध्य भारत आणि त्या लगतच्या वायव्य भारताला मार्च 2023 ते मे 2023 या काळात उष्णतेच्या लाटांचा जास्त फटका बसेल. हा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मार्च महिन्यामध्ये दक्षिण भारताचा काही भाग वगळता देशभरात कमाल आणि किमान तापमान सरासरीहून अधिक असेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मार्च 2023 मध्ये देशातील पाऊस सरासरीइतका असेल. वायव्य, मध्य पश्चिम, पूर्व आणि ईशान्य भारताचा काही भाग येथे उन्हाळ्यात सरासरीहून कमी पाऊस पडेल. पूर्व मध्य, दक्षिण आणि ईशान्य भारतातील तुरळक ठिकाणी सरासरीहून अधिक पावसाचा अंदाज आहे. कोकण विभागात मार्च महिन्यामध्ये कमाल तापमान सरासरीहून अधिक असेल. तर किमान तापमान मध्य महाराष्ट्रातील तुरळक भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीहून जास्त असेल, असे हवामान विभागाचे म्हणणे आहे.

Holi : गोडधोड खाऊन पोट बिघडले तर करा हे उपाय ।  या लोकांना पपई खाल्ल्याने होईल नुकसान

कच्ची पपई खा आणि अनेक आजारांपासून लांब राहा । जास्त चिकन खाल तर तब्येत बिघडवाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी