मराठा आरक्षणावर उच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी

मुंबई
Updated Jun 27, 2019 | 14:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

Maratha Reservation verdict: मराठा आरक्षणा संदर्भात आज (२७ जून रोजी) उच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षण कायदा वैध आहे की नाही या संदर्भात न्यायालय निर्णय देणार आहे.

Maratha Reservation
मराठा आरक्षणावर उच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी  |  फोटो सौजन्य: BCCL

मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्यात अनेक आंदोलन झाली. या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षण कायदा केला आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं. मात्र, त्यानंतर या आरक्षणाला न्यायालयात आव्हान देण्यात आलं. हे आरक्षण वैध नसून घटनाबाह्य असल्याचं सांगत न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या. या याचिकांवर एकत्र सुनावणी न्यायालयाने घेतली आता या संदर्भात मुंबई उच्च न्यायालय आज (२७ जून) अंतिम सुनावणी घेत निर्णय देणार आहे.

मराठा समाजासाठी राज्य सरकारने ३० नोव्हेंबर २०१८ रोजी मराठा आरक्षणाचा कायदा केला. राज्यातील दोन्ही सभागृहांमध्ये मराठा आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आलं. यानुसार, मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक क्षेत्रात १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला. मात्र, या आरक्षणाच्या विरोधात उच्च न्यायालयात काही याचिका दाखल करण्यात आल्या. या सर्व याचिकांवर उच्च न्यायालयाने एकत्रित सुनावणी घेतली. या याचिकांवर युक्तीवाद २६ मार्च रोजी पूर्ण झाला आणि त्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला. आता मराठा आरक्षण वैध की अवैध या संदर्भात मुंबई उच्च न्यायालय आपला अंतिम निर्णय देणार आहे.

ज्या प्रमाणे मराठा आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या त्याच प्रमाणे मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ देखील याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. समर्थनार्थ आणि विरोधात असलेल्या याचिकांवर न्यायालयात युक्तिवाद पूर्ण झाला आहे. त्यानंतर आता या संदर्भात न्यायालयात अंतिम फैसला होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डोंगरे यांचं खंडपीठ निकाल देणार आहे. उच्च न्यायालयाच्या या निकालाकडे महाराष्ट्रातील सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

राज्य सरकारने मराठा आरक्षण मंजूर करत मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या नागरिकांना आरक्षण मंजूर केलं. या आरक्षणानुसार, मराठा समाजातील नागरिकांना सरकारी नोकरी आणि शिक्षणात १६ टक्के आरक्षण दिले गेले. मात्र, या आरक्षणाला विरोध करत याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
मराठा आरक्षणावर उच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी Description: Maratha Reservation verdict: मराठा आरक्षणा संदर्भात आज (२७ जून रोजी) उच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षण कायदा वैध आहे की नाही या संदर्भात न्यायालय निर्णय देणार आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles