अभिनेत्री केतकी चितळेला जामीन

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jun 22, 2022 | 21:36 IST

Marathi Actress Ketaki Chitale get Bail : फेसबुक पोस्टमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेली अभिनेत्री केतकी चितळे हिला ठाणे कोर्टाने जामीन मंजूर केला. 

Marathi Actress Ketaki Chitale get Bail
अभिनेत्री केतकी चितळेला जामीन 
थोडं पण कामाचं
  • अभिनेत्री केतकी चितळेला जामीन
  • ठाणे कोर्टाने जामीन मंजूर केला
  • केतकीला १५ मे रोजी अटक झाली होती

Marathi Actress Ketaki Chitale get Bail : मुंबई : फेसबुक पोस्टमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेली अभिनेत्री केतकी चितळे हिला ठाणे कोर्टाने जामीन मंजूर केला. 

अभिनेत्री केतकी चितळे हिच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी करणारी फेसबुक पोस्ट केल्याचा आरोप आहे. केतकी चितळे प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. केतकीची पातळी सोडून केलेली टिप्पणी खपवून घेणार नाही, अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी केतकी चितळे विरोधात पोलीस तक्रारी दाखल झाल्या. यामुळे एका पोलीस ठाण्यातील तक्रारीत न्यायालयीन कोठडी दिली जाताच दुसऱ्या पोलीस ठाण्याकडून केतकीचा ताबा घेण्याच्या हालचाली होत होत्या. 

केतकीला १५ मे रोजी अटक झाली. न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर केतकीने या प्रकरणात जामीन मिळविण्यासाठी वकिलांमार्फत ठाणे न्यायालयात अर्ज केला होता. अखेर महिन्याभरानंतर ठाणे न्यायालयाने तिला याप्रकरणात जामीन मंजूर केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी