मराठी भाषा गौरवदिन: 'मराठी भाषा दिन'निमित्त शुभेच्छापत्रे

मराठी भाषा दिन: मराठी भाषा ही सर्वश्रेष्ठ भाषा असून आपल्या मातृभाषेचा अभिमान सर्वांनाच आहे. आज मराठी भाषा दिन सर्वत्र साजरा केला जात आहे. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देणारे शुभेच्छापत्रे खास तुमच्या

Marathi Bhasha Din
'मराठी भाषा दिन'निमित्त शुभेच्छा देणारे शुभेच्छापत्रे  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई : विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान आहे. एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार म्हणून त्यांची ख्याती आहे. 'कुसुमाग्रज' या टोपण नावाने त्यांनी काव्यलेखन केले. कुसुमाग्रज यांच्या स्मृतिला अभिवादन म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे त्यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. 

मराठी भाषा गौरव दिन हा देशभरासह जगभरात साजरा केला जात आहे. प्रत्येक क्षेत्रात मराठी भाषेचा वापर होणे आवश्यक आहे. मराठी ही आपली मातृभाषा असून त्याचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सर्वचजण समाजमाध्यमात शुभेच्छा देत आहेत. समाजमाध्यमातील असेच काही शुभेच्छापत्रे आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शुभेच्छापत्रे

 

लाभले आम्हास भाग्य 

बोलतो मराठी 

जाहलो खरेच धन्य 

ऐकतो मराठी 

 

आमच्या मनामनात दंगते मराठी 

आमच्या रगारगात रंगते मराठी 

अभिमान बाळगण्यासोबतच मराठी भाषेचे जतन आणि प्रसार करण्याचा निश्चय आज मराठी भाषा दिनानिमित्त करूया 

 

मराठी भाषा बोलण्याचे भाग्य आम्हाला लाभले 

हीच आमची पुण्याई...

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

मराठी म्हणजे गोडवा, 

मराठी म्हणजे प्रेम, 

मराठी म्हणजे संस्कार, 

मराठी म्हणजे आपुलकी, 

मराठी म्हणजे महाराष्ट्र

मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा 

 

!!बोलतो मराठी, ऐकतो मराठी!!

!!जाणतो मराठी, मानतो मराठी!!

मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...


मराठी भाषा, मराठी मन, 

अभिमान महाराष्ट्राचा, 

स्वाभिमान मराठीचा...!!

मराठी भाषा दिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा..!

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी